Pune Rain : पुणे, बारामतीत तुफान पाऊस! वीर धरणातून ४७ हजार क्युसेकचा विसर्ग, नीरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Pune Rain : गेल्या दोन दिवसांपासून पुणे, बारामतीमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. नीरा नदीच्या खोऱ्यात होत असलेल्या दमदार पावसामुळे नीरा नदीवरील चारही धरणांमधून नीरा नदीत पाणी सोडलं जात आहे. त्यामुळे नीरा नदीकाठी पूरस्थिती निर्माण झाली असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नीरा नदीच्या खोऱ्यात होत असलेल्या दमदार पावसामुळे नीरा नदीवरील चारही धरणांमधून नीरा नदीत पाणी सोडलं जात आहे. त्यामुळे नीरा नदीकाठी पूरस्थिती निर्माण झाली आहे. नीरा नदीमध्ये वीर धरणांमधून पाणी सोडण्याच्या प्रमाणात मोठी वाढ करण्यात आली आहे.

Susari Dam : सुसरी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू; नदी काठावरील गावांना सावधानतेचा इशारा

वीर धरणातून आता 47 हजार क्यूसेक्स वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. वीर धरणामध्ये भाटघर धरणांमधून 22 हजार क्यूसेक्स तर नीरा देवघर धरणातून 7 हजार क्यूसेक्स आणि गुंजवणी धरणातून साडे तीन हजार असे 33 हजार 500 क्यूसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे नीरा नदीला सध्या पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली असून पाठबंधारे विभागाने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

पुणे सोलापूर आणि पुणे जिल्ह्यासाठी जीवनदायनी ठरलेलं उजनी धरणातील पाणीसाठा ८७टक्क्याहून अधिक झाला आहे. उजनीवर अवलंबून असणाऱ्या सर्वांसाठी ही आनंदाची बातमी आहे. आज रविवारी दुपारी12 च्या आकडेवारीनुसार उजनी धरण हे ८७.६८टक्के भरलं असून उजनीत एकूण ११० पूर्णांक ६३ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. दरम्यान सायंकाळी पाच वाजता उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यात येणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply