Pune Police : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीसांची मोठी कारवाई; एकाच दिवशी 12 सराईत गुन्हेगार तडीपार

Pune Police : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  पुणे शहरात पोलीस अलर्ट मोडवर आल्याचं दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त नितेश कुमार यांच्या निर्णयांचा धडाका सुरूच आहे. आता पुणे पोलिसांनी एकाच दिवशी १२ सराईत गुन्हेगारांना तडीपार केलं आहे. शहरामध्ये पोलिसांकडून निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर विशेष काळजी घेण्यात येत आहे.

पुणे पोलिसांनी एकाच दिवशी १२ सराईत गुन्हेगारांना तडीपार केलं. त्यामुळं शहरात चांगलीच खळबळ उडाली होती. नेमके हे गुन्हेगार कोण होते, त्यांना का तडीपार करण्यात आलंय हे आपण सविस्तर जाणून घेऊ  या. पुणे शहरात गुन्हेगारीवर अंकुश लावण्यासाठी पोलिसांकडून विविध उपक्रम देखील राबविले जात आहेत.

Sangamner Crime News : शुल्लक कारणावरून वाद, दोन मित्रांकडून तरुणाची निर्घृण हत्या; संगमनेरमधील थरारक घटना

गुंडाना तडीपार करण्याचे आदेश

खुन, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दरोड्याची तयारी करणे, इच्छापुर्वक गंभीर दुखापत करणे, घरफोडी करणे, दुखापत करुन मारहाण करणे, महिलांवरील अत्याचार, बेकायदेशीर अग्निशस्त्र व प्राणघातक शस्त्र विनापरवाना जवळ बाळगणे, दहशत करुन सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, चोरी व घरफोडी करणे अशा प्रकारचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांना पुणे पोलिसांना तडीपार केलं  आहे. रेकार्डवरील गुन्हेगारांना पुणे पोलिसांनी तडीपार केलं आहे.

महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५६ प्रमाणे ११ गुन्हेगारांवर व कलम ५७ प्रमाणे ०१ गुन्हेगार अशा एकुण १२ गुन्हेगारांना पुणे पोलीस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय व पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत.

 

पोलीस सुरक्षा काढल्याचा निर्णय

पुणे पोलिसांनी शहरातील एकूण ११० जणांना पोलीस सुरक्षा पुरवली होती. त्यापैकी ८५ जणांची पोलीस सुरक्षा काढण्यात आली आहे. त्यासोबत अनावश्यक अशा शहरातील २३ ठिकाणांवरील देखील सुरक्षा गार्ड काढण्यात आले  आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हा निर्णय घेतला होता. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील विविध राजकीय पक्षांचे राष्ट्रीय स्थरावर असलेले अध्यक्ष, प्रमुख तसेच नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते यांची सुरक्षा काढण्यात आली आहे.

पोलीस आयुक्तांच्या या निर्णयामुळे तब्बल ३५० पोलीस कर्मचारी हजर झाले आहेत. परिणामी याचा फायदा पोलिसींगसाठी होणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply