Pune News : पुण्यातील बांधकाम क्षेत्राच्या व्यवहारात ९० टक्क्यांनी वाढ; ‘क्रेडाई सीआरई’ अहवालातील निष्कर्ष

पुणे : देशातील इतर मेट्रो शहरांच्या तुलनेत पुण्यातील बांधकाम व्यवसाय बाजारपेठ ही परवडणारी आणि प्राधान्याने वाढणारी असल्याचे ‘क्रेडाई पुणे मेट्रोच्या’ ‘क्रेडाई सीआरई’ अहवालातून समोर आले आहे.

२०१९ च्या तुलनेत येथील बांधकाम क्षेत्रातील व्यवहारात तब्बल ९० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर २०२३ च्या पहिल्या सहामाहीत २८ हजार कोटी रुपयांच्या घरांची विक्री झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

‘सीआरई मॅट्रिक्स’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक गुप्ता आणि डेटा विश्‍लेषक राहुल अजमेरा यांनी हा अहवाल नुकताच ‘मेंबर असिस्टंस मिटींग’ मध्ये मांडला. क्रेडाई पुणे मेट्रोच्या जनसंपर्क विभागाचे समन्वयक कपिल गांधी, व्यवस्थापकीय समिती सदस्य अभिषेक भटेवरा आणि महासंचालक डॉ. डी. के. अभ्यंकर यावेळी उपस्थित होते.

Devendra Fadnavis News: जालना लाठीहल्ला प्रकरणी माफी मागतो, दोषींवर कारवाई होणार; देवेंद्र फडणवीसांची ग्वाही

अहवालासंदर्भात ‘क्रेडाई पुणे मेट्रो’चे अध्यक्ष रणजित नाईकनवरे म्हणाले, ‘‘अहवालातील जानेवारी ते जूनमधील आकडेवारीनुसार शहराची बांधकाम व्यवसाय बाजारपेठ ही देशातील इतर मेट्रो शहरांच्या तुलनेत सर्वांत वेगाने वाढणारी आणि परवडणारी बाजारपेठ आहे.

जानेवारी ते जून २०२३ दरम्यान पुनर्विक्री वगळून पुण्यात ४५ हजार घरांची विक्री झाली आहे. याची किंमत ही तब्बल २८ हजार कोटी रुपये आहे. २०१९ च्या तुलनेत यामध्ये ९० टक्के वाढ झाली आहे.’’



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply