Pune : पुणे महापालिकेत समाविष्ट ३४ गावांना होतोय स्वच्छ पाणी पुरवठा.. मुख्यमंत्र्यांचा विधानसभेत निर्वाळा

खडकवासला - पुणे महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या गावांमध्ये पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हे अंशत: खरे आहे. परंतु काही ठिकाणी अस्वच्छ पाणी पुरवठा होत आहे, ही बाब खरी नाही.

अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंगळवारी विधानसभेत लेखी उत्तरातून दिली. तर नव्याने समाविष्ट ११ व २३ गावांकरीता पाणी पुरवठा करण्यासाठी सविस्तर तपशीलवार प्रकल्प अहवाल (डी.पी.आर.) करण्याची कार्यवाही महापालिकेमार्फत सुरू आहे. असे ही मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

बहुचर्चित समान पाणीपुरवठा योजनेचे काम अपूर्णावस्थेत आहे. समाविष्ट गावांमध्ये पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही ठिकाणी अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे.

नांदेड, किरकीटवाडी, नांदोशी या समाविष्ट गावांना विहिरीवरून पाणी पुरवठा केला जात आहे. नागरिकांना शुद्ध पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. तसेच अनेक भागात चढ्या दराने टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.

Bacchu Kadu On Ministership : बच्चू कडू यांनी मंत्रिपदाचा दावा सोडला, त्यामागचं कारणही केलं स्पष्ट

महानगरपालिका प्रशासनामार्फत कोणत्याही प्रकारची प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आली नाही. पाणी प्रश्न लवकर सोडविणे, स्वच्छ पाणीपुरवठा करणे, समान पाणी पुरवठा योजना तात्काळ पूर्ण करणे, टँकर माफियांवर नियंत्रण आणणे,

पाणी पुरवठा योजनेचे काम पुर्ण न करणाऱ्या ठेकेदारांवर तसेच या संपुर्ण प्रकरणी जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणे, तसेच अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे होणाऱ्या आजारांवर नियंत्रण आणण्यासंदर्भात कोणती कार्यवाही केली याबाबत आमदार भीमराव तापकीर यांनी लक्ष वेधण्यासाठी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.

त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे की, पुणे महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या गावांमध्ये पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, हे अंशत: खरे आहे. तथापि, काही ठिकाणी अस्वच्छ पाणीपुरवठा होत आहे, ही बाब खरी नाही. पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट २३ गावांपैकी नांदेड,

किरकीटवाडी व नांदोशी या गावांना ३००० मी.मी. व्यासाच्या लाईनमधून ग्रामपंचायत काळात अस्तित्वात असलेल्या नांदेड विहीर येथे पाणी (raw water) घेण्यात येऊन, या पाण्यामध्ये ब्लिचींग पावडरचे द्रावण तयार करून टाकण्यात येऊन, या गावांमध्ये अस्तित्वात असलेल्या वितरण व्यवस्थेमधून पाणी पुरवठा करण्यात येत आहे. असे पुणे महानगरपालिकेने कळविलेले आहे.

नांदेड, किरकिटवाडी व नांदोशी या गांवाकरीता प्रक्रिया न केलेले पाणी (raw water) अस्तित्वातील ग्रामपंचायतींच्या विहिरीमध्ये घेण्यात येते. या गावांतील नागरिकांना साथीचे रोग होऊ नयेत म्हणून पाणी पुरवठा विभागामार्फत अस्तित्वातील विहिरीमध्ये आवश्यक त्या प्रमाणात ब्लिचींग पावडरने निर्जंतुकीकरण करून परिसरातील नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

तसेच, पुणे महानगरपालिकेमार्फत नव्याने समाविष्ट ११ व २३ गावांकरीता पाणीपुरवठा करण्यासाठी सविस्तर डी.पी.आर. करण्याचे कार्यवाही महानगरपालिकेमार्फत सुरू असल्याचे पुणे महानगरपालिकेने कळविलेले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply