Pune : सातगाव पठार पाणी प्रश्नासाठी उपोषणकर्त्यां समवेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना भेटणार - शिवाजीराव आढळराव पाटील

मंचर : “कळमोडी धरणातील पाणी सातगाव पठार (ता.आंबेगाव) परिसरातील शेतीला मिळावे. हा प्रश्न तातडीने सुटावा म्हणून शेतकरी बांधवांना सोबत घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणार आहे.”

असे शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले. मुंबई-आझाद मैदान येथे कळमोडी धरणातील पाणी सातगाव पठारासह शिरूर व खेड कोरडवाहू गावांना मिळावे.

Follow us -

Sharad Pawar : राज्यात धार्मिक दंगली जाणीवपूर्वक घडवल्या जात आहेत; शरद पवार गंभीर आरोप

या मागणीसाठी पुणे जिल्हा परिषदेचे शिवसेनेचे माजी गटनेते देविदास दरेकर यांच्या नेतुत्वाखाली शेतकरी सोमवार (ता.२६) पासून उपोषणाला बसले आहेत. आढळराव पाटील यांच्या सह युवासेना कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर, प्रविण थोरात पाटील, डॉ.सुभाष पोकळे यांनी उपोषण कार्यकर्त्या बरोबर चर्चा केली. उपोषण कर्त्यांच्या भावना तीव्र होत्या.

“खेड, आंबेगाव व शिरूर तालुक्यातील शेतकर्यांना वरदान ठरणाऱ्या कळमोडी प्रकल्पाला गती मिळण्यासाठी व डिंभे धरणातून बोगद्याद्वारे पाणी थेट नगर जिल्ह्यात नेण्याचा घाट घालणाऱ्या प्रवृत्तींना रोखण्यासाठी उपोषण सुरु आहे.” असे दरेकर यांनी सांगितले. “शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्नासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार आहे.”असे आढळराव पाटील यांनी सांगितले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply