Pune : पुण्यातील ८ महिन्यांपासून न सुटणारा खोकला नर्सच्या लक्षात आलं आणि डॉक्टरांनी उघडलं आईच्या त्या सवयीमागचं गूढ

Pune : उपचार घेऊनही सहा वर्षांच्या मुलीचा खोकला आठ महिन्यांपासून बरा होत नव्हता. खोकल्याचे कारण शोधण्याचे आव्हान डॉक्टरांसमोर निर्माण झाले. मात्र, डॉक्टरांनी केलेल्या शर्थीच्या प्रयत्नानंतर मुलीच्या आईकडून वापरल्या जाणाऱ्या परफ्युमच्या तीव्र सुगंधामुळे मुलीला वारंवार खोकला येत असल्याचे निदान झाले.

या मुलीला गेल्या आठ महिन्यांपासून सतत खोकला, रात्रीच्या वेळी झोपेत खोकल्याची उबळ येणे, सतत घशात खवखवणे या प्रकारचा त्रास होत होता. विविध तपासण्या, औषधोपचार करूनही खोकला कमी होत नव्हता. यामुळे या मुलीवर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. सुरुवातीच्या तपासणीदरम्यान छातीचा आवाज सामान्य होता; तसेच छातीच्या एक्सरेमध्येही निदान न झाल्याने औषधे देऊन एका महिन्यानंतर पुन्हा तपासणी करण्यात आली.

Dharashiv : दारू पाजून डोळ्यात मिरची पावडर टाकली; पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या,धाराशिव हत्याकांडाचा थरारक उलगडा

तपासणीदरम्यान मुलीची आई डॉक्टरांसोबत बोलत असताना डॉक्टरांच्या शेजारी उभी असलेली नर्स अचानक खोकायला लागली. यानंतर डॉक्टरांनी या नर्सला प्रकृतीबाबत विचारणा केली असता मुलीच्या आईने वापरलेल्या परफ्युममुळे खोकला येत असल्याचे परिचारिकेने सांगितले. तिच्या या उत्तरामुळे खोकल्यामागचे कारण परफ्युम असल्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली. त्यानुसार मुलीच्या आईला परफ्यूम न वापरण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यानंतर पंधरा दिवसांनी या मुलीचा खोकला पूर्णपणे बरा झाला होता.

अंकुरा हॉस्पिटलमधील बालरोग तज्ज्ञ डॉ. मौनिश बालाजी यांच्या पथकाने या मुलीवर उपचार केले. तीव्र सुगंधामुळे मुलांच्या श्वसनमार्गाला त्रास होऊ शकतो आणि सतत खोकला येऊ शकतो. परफ्युम, एअर फ्रेशनर, डास पळवणारे स्प्रे, अगरबत्ती; तसेच सुगंधी डिटर्जंट यांमुळे खोकल्याचा त्रास वाढू शकतो. त्यामुळे घरात अशा वस्तूंचा अतिरेक टाळणे आवश्यक आहे, असेही डॉक्टरांनी सांगितले.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

4 thoughts on “Pune : पुण्यातील ८ महिन्यांपासून न सुटणारा खोकला नर्सच्या लक्षात आलं आणि डॉक्टरांनी उघडलं आईच्या त्या सवयीमागचं गूढ

Leave a Reply to Coraline3997 Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *