Pune : पुण्यात धावत्या बसला आग! २० प्रवाशांचा थरारक बचाव , चालकाच्या तत्परतेमुळे टळला मोठा अनर्थ

 

Pune : पुण्यात काल संध्याकाळी भीषण अग्नितांडव पाहायला मिळाले. रांजणगाव वरून पुण्याकडे जाणाऱ्या खासगी बसला अचानक आग लागली, आणि काही क्षणात संपूर्ण बस ज्वाळांनी वेढली. सुदैवाने चालकाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला असून, सर्व प्रवासी सुखरूप बचावले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मौजे कोरेगाव भीमा परिसरात सायंकाळी सुमारे सातच्या सुमारास घडली. MH-12 VF-6226 या क्रमांकाची खाजगी बस रांजणगाव औद्योगिक परिसरातील कर्मचाऱ्यांना घेऊन पुण्याच्या दिशेने निघाली होती. प्रवासादरम्यान बसमध्ये असलेल्या बॅटरीच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागली, आणि क्षणातच बस धूर व ज्वाळांनी भरून गेली.

Pune : पुणे मेट्रो 3 विस्तार : आता बाणेरपर्यंत धावणार मेट्रो, IT हबला मिळणार नवा शॉर्टकट!

परिस्थिती गंभीर होताच वाहनचालकाने प्रसंगावधान राखत बस तत्काळ रस्त्याच्या कडेला उभी केली आणि प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवलं. बसमध्ये त्या वेळी सुमारे १५ ते २० कर्मचारी प्रवास करत होते.

घटनास्थळी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं आणि त्यांनी तात्काळ कारवाई करत आगीवर नियंत्रण मिळवलं. मात्र तोपर्यंत बस पूर्णतः जळून खाक झाली होती.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र बस जळून खाक झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. धावत्या वाहनांना लागणाऱ्या आगीच्या वाढत्या घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *