पुणे - तुम्ही १२ वर्षे जुन्या इमारतीमधील सदनिका खरेदी करताना रेडी-रेकनरमधील त्या इमारतीचे दर विचारात घेऊन त्यामध्ये १० टक्केच सवलत देऊन मुद्रांक शुल्काची (Stamp Duty) आकारणी केली जात होती. आता मात्र त्याच इमारतीतील सदनिका तुम्ही खरेदी करीत असाल, तर पाच वर्षांपर्यंत पाच टक्के, तर त्यापुढील प्रत्येक वर्षांसाठी एक टक्का अशी १२ टक्क्यांपर्यंत जमिनींच्या दरात सवलत देऊन त्यावर सात टक्के मुद्रांक शुल्क आकारले जाणार आहे. अशी जास्तीत जास्त ७० टक्क्यांपर्यंत सवलत देऊन त्यावर मुद्रांक शुल्काची (स्टॅम्प ड्यूटी) आकारणी केली जाणार आहे. त्यामुळे जेवढी जुनी इमारत, तेवढे मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्यूटी) कमी भरावे लागणार आहे.
नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने प्रथमच जुन्या इमारतींच्या मूल्यांकनाच्या पद्धतीत बदल केला आहे. पूर्वी शून्य ते पाच वर्षे, पाच ते दहा वर्षे आणि दहा वर्षांनंतर पुढील प्रत्येक दहा वर्षे विचारात घेऊन जमिनींचे दर निश्चित करून त्यावर मुद्रांक शुल्क आकारणी केली जात होती. त्यामुळे ११ वर्षे जुनी इमारत असेल, अशा सदनिकांवर मुद्रांक शुल्क आकारताना जी सवलत मिळत होती, तेवढीच सवलत १६ वर्षे जुनी असलेल्या इमारतीतील सदनिका खरेदी करीत असताना मिळत होती. अशी अधिकाधिक ३० टक्क्यांपर्यंत मुद्रांक शुल्कात सवलत (घसारा) मिळत होती. परिणामी नागरीकांना त्याचा फारसा फायदा होत नव्हता.
कसा होणार फायदा...
- शून्य ते पाच वर्षांपर्यंत - ५ टक्के
- पाच ते सहा वर्षे - ६ टक्के
- सहा ते सात वर्षे - ७ टक्के
- सात ते आठ वर्षे - ८ टक्के
- आठ ते नऊ वर्षे - ९ टक्के
- नऊ ते दहा वर्षे - १० टक्के
अशाप्रकारे रेडी-रेकनरमध्ये सध्या असलेल्या जमिनींच्या दरात ७० टक्क्यांपर्यंत सवलत (घसारा) धरून त्यावर मुद्रांक शुल्क आकारले जाणार आहे.
आता काय बदल
1) शून्य ते पाच वर्षांपर्यंतच्या जुन्या इमारतीतील सदनिकांची खरेदी करताना तेथील जमिनींचा रेडी-रेकनरमधील दर विचारात घेऊन त्यावर ९५ टक्के रकमेवर मुद्रांक शुल्क भरावे लागणार आहे. पाच टक्केच सवलत मिळेल.
2) पाच वर्षांपुढील जुनी इमारत असेल, तर पाच वर्षांपर्यंत पाच टक्के आणि त्यापुढील प्रत्येक वर्षांसाठी एक टक्का हे विचारात घेऊन तेवढ्या जमिनींच्या दरात कपात करून त्यावर मुद्रांक शुल्क आकारले जाणार आहे.
3) १२ वर्षे जुनी इमारत असेल, तर सध्या त्या जमिनीचा रेडी-रेकनरमधील जो दर आहे, त्या दरात पहिल्या पाच वर्षांसाठी पाच टक्के, तर त्या पुढील प्रत्येक वर्षांसाठी एक टक्का अशी १२ टक्के कमी किंमत ग्राह्य धरून त्यावर सात टक्के मुद्रांक शुल्क आकारले जाणार आहे.
जुन्या इमारतींमधील सदनिकांची खरेदी-विक्री करताना आकारण्यात येणाऱ्या मुद्रांक शुल्काच्या रचनेत यंदा प्रथमच बदल केला आहे. पाच वर्षांपर्यंत पाच टक्के आणि त्यापुढील प्रत्येक वर्षासाठी एक टक्का घसारा धरण्याचे धोरण निश्चित केले आहे. जास्तीत जास्त ७० टक्क्यांपर्यंत ही सवलत मिळेल.
- नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग
शहर
- लाचखोर पोलिसांचा पर्दाफाश! हुंड्या प्रकरणातील केस कमकुवत करण्यासाठी लाच घेणाऱ्या कर्नाटक पोलिसांना राजस्थानात अटक
- पुण्यात आरटीई प्रवेशाचा 'खेळखंडोबा'; युरो स्कूलने ५ वर्षांच्या बालकाला हाकलले, प्रवेशासाठी ५० हजारांची मागणी; शिक्षण संचालकांचे एफआयआरचे आदेश!
- राजकीय दौरा ठरला थरारक! नाशिकमध्ये भाजप नगरसेवकांच्या बसचा हॉटेलच्या भिंतीला भीषण अपघात
- नागपूर: तर्री पोह्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत; ७ जणांविरोधात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- पुण्यात आरटीई प्रवेशाचा 'खेळखंडोबा'; युरो स्कूलने ५ वर्षांच्या बालकाला हाकलले, प्रवेशासाठी ५० हजारांची मागणी; शिक्षण संचालकांचे एफआयआरचे आदेश!
- राजकीय दौरा ठरला थरारक! नाशिकमध्ये भाजप नगरसेवकांच्या बसचा हॉटेलच्या भिंतीला भीषण अपघात
- नागपूर: तर्री पोह्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत; ७ जणांविरोधात गुन्हा दाखल
- रेल्वे प्रवाशांसाठी मोठा दिलासा! सोलापूरजवळील टिकेकरवाडी यार्डाचा कायापालट; गाड्या धावणार आता अधिक वेगाने आणि सुरक्षित!
गुन्हा
- लाचखोर पोलिसांचा पर्दाफाश! हुंड्या प्रकरणातील केस कमकुवत करण्यासाठी लाच घेणाऱ्या कर्नाटक पोलिसांना राजस्थानात अटक
- नागपूर: तर्री पोह्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत; ७ जणांविरोधात गुन्हा दाखल
- पुणे-नाशिक महामार्गावर संतापजनक घटना; तरुणीला ओढून नेऊन कालव्यात फेकले, नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
- कल्याणमध्ये क्रूरतेचा कळस! हुंड्यासाठी गर्भवती महिलेचे मुंडण, गरम पाण्याने चटके देत सासरच्यांनी केला छळ!
राजकीय
- 'टीएमसी' कुणाची? ममता बॅनर्जींच्या पक्षात फूट; बंडखोर खासदारांची आता पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा करण्याची तयारी!
- चंद्रपूर काँग्रेसमध्ये राजकीय वादळ; धानोरकर-वडेट्टीवार यांच्या दोन 'व्हीप'मुळे नगरसेवक संभ्रमात!
- विधान परिषद निवडणुकीत पुन्हा 'हॉटेल पॉलिटिक्स'चा खेळ; दगाफटका टाळण्यासाठी महायुतीकडून नगरसेवकांचे 'ऑपरेशन ठाणे'!
- दादरमध्ये पांढऱ्या पट्ट्यांवरून नवा वाद: संदीप देशपांडेंचा आक्रमक पवित्रा, पालिकेला दिला ३ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम!
इतर
- आजचे राशिभविष्य १४ जून २०२६: बाप्पा आणि हनुमानजींच्या कृपेने कोणत्या राशींचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- पुणे: आजी-आजोबांच्या डोळ्यांतील प्रकाश जपण्यासाठी पुण्यात अनोखा उपक्रम; मोतीबिंदू शस्त्रक्रिया फक्त ₹६,९९९ मध्ये
- आजचे राशिभविष्य १२ जून २०२६: 'या' राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; जाणून घ्या तुमचे नशीब!
- आर्थिक राशिभविष्य ११ जून २०२६: कमला एकादशीच्या दिवशी या राशींवर बरसणार धन, मिळेल यश!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- अमेरिका-इराण शांतता करार: इराणकडून तुर्की, इराक आणि इजिप्तशी चर्चा; पंतप्रधान मोदींनी केले स्वागत
- ब्रिटनचा ऐतिहासिक निर्णय! १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदी; ऑनलाइन सुरक्षिततेसाठी मोठे पाऊल
- इंधन दरांचा खेळ! पाकिस्तानमध्ये पेट्रोल स्वस्त तर भारतात महाग; दोन्ही देशांच्या दरामागचे अर्थकारण काय?
- बापरे! हवेतच दोन हेलिकॉप्टरची भीषण धडक; अपघातात ६ जणांचा मृत्यू, अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर!























Subscribe to my channel



