Pune : पुणे ग्रँड टूर: सायकलिंग क्षेत्रात भारताची नवी भरारी!

Pune : भारतात पहिल्यांदाच होणार UCI 2.2 मल्टीस्टेज शर्यतीचे आयोजन; अधिकृत चिन्ह आणि शुभंकराचे अनावरण २०२८ साली होणाऱ्या उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेसाठी पात्रता फेरी म्हणून पुणे ग्रँड टूरला मान्यता पुणे (२९ ऑक्टोबर २०२५): भारताच्या पहिल्या व्यावसायिक प्रो स्टेज एलीट पुरुष सायकलिंग स्पर्धा (UCI 2.2) या आंतरराष्ट्रीय सायकलिंग इव्हेंटचे अधिकृत चिन्ह आणि शुभंकराचे अनावरण उत्साही नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात आले. या सोबतच “पुणे ग्रँड टूर २०२६” या भारतातील पहिल्या जागतिक पातळीच्या सायकलिंग स्पर्धेची घोषणा करण्यात आली.

पुणे ग्रँड टूर ही स्पर्धा २०२८ मध्ये होणाऱ्या उन्हाळी ऑलिंपिकसाठी पात्रता फेरी म्हणून स्विकारली जाणार आहे. या अंतर्गत आंतरराष्ट्रीय खेळाडूंना १९ ते २३ जानेवारी २०१६ दरम्यान आयोजित पाच दिवसीय, अनेक टप्प्यांची शर्यत पूर्ण करून महत्त्वाचे रेस-पॉइंट्स मिळवण्याची संधी मिळणार आहे.

Pune : समाविष्ट ३२ गावांतील करआकारणी अडली; व्यावसायिक व अनधिकृत मिळकतींवरून वाद

या प्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (CFI), क्रीडा व युवक कल्याण विभाग आणि पुणे जिल्हा प्रशासन यांनी एकत्रितपणे महाराष्ट्रात आणि भारतात सायकलिंग क्रांती घडवण्याची वचनबद्धता व्यक्त केली.

UCIच्या वार्षिक कॅलेंडरमध्ये ‘एलीट इव्हेंट’ म्हणून वर्गीकृत असलेली पुणे ग्रँड टूर ही भारतासाठी जागतिक क्रीडा मंचावर सहभागी होण्याची ऐतिहासिक घटना आहे. ४३७ किमीच्या मार्गावर आधारित ही स्पर्धा पुणे जिल्ह्याच्या शहरी भाग, डोंगराळ परिसर आणि ग्रामीण रस्त्यांचा संगम दाखवणारा एक भव्य अनुभव आहे.

या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “भारतातील पहिल्या ‘UCI 2.2’ आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेचे आयोजन पुण्यात होत आहे. ही आपल्या सर्वांसाठी एक ऐतिहासिक घटना आहे. पुणे ग्रँड टूर हे महाराष्ट्राच्या क्रीडा दृष्टिकोणाचे प्रतीक आहे. आमचा उद्देश क्रीडा क्षेत्रासाठी आवश्यक पायाभूत सुविधा विकसित करणे आणि सायकलिंगसारख्या खेळांना नवसंजीवनी देणे आहे. या उपक्रमातून भारतातील तरुण सायकलपटूंना प्रोत्साहन मिळेल आणि आपल्या नव्या राष्ट्रीय सायकलपटूंची निर्मिती होईल.”

या प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “सायकलिंग हा केवळ एक खेळ नाही. ती एक जागतिक चळवळ आहे. मात्र भारत अद्याप या जागतिक समुदायाचा भाग झालेला नाही. त्यामुळे आजचा दिवस केवळ पुण्यासाठीच नाही तर महाराष्ट्र आणि भारतासाठीही ऐतिहासिक आहे. आज आपण जगातील सायकलिंग समुदायात सामील होण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे.”भारत हा जगातील सर्वात तरुण देश आहे आणि एक आर्थिक महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यामुळे आपल्या क्रीडा क्षमतेचे दर्शन घडवण्याची ही योग्य वेळ आहे.

पुण्याचे जिल्हाधिकारी आणि पुणे ग्रँड टूरचे प्रभारी जितेंद्र डुडी म्हणाले, “पुणे ग्रँड टूरमुळे भारत जागतिक सायकलिंग मंचावर एक धाडसी पाऊल टाकत आहे. भारतातील तरुणांना व्यावसायिक सायकलिंगकडे वळवणे आणि या देशात सायकलिंगला नव्या पातळीवर नेणे हा आमचा उद्देश आहे. आम्हाला अशी परंपरा निर्माण करायची आहे की सायकलिंगकडे केवळ विरंगुळा म्हणून नाही, तर जागतिक क्रीडा उत्कृष्टतेचा मार्ग म्हणून पाहिले जावे.”

सायकलिंगविषयी देशातील वाढता उत्साह आणि भारताची दीर्घकालीन क्रीडा परंपरा पाहता जगातील सर्वोत्तम सायकलिंग स्पर्धांमध्ये स्थान मिळवण्याचे पुणे ग्रँड टूरचे उद्दिष्ट आहे. ही स्पर्धा भारतीय सायकलिंग क्षेत्रातील परिवर्तनाचा द्योतक ठरणार आहे ज्याचा लाभ केवळ व्यावसायिक खेळाडूंनाच नव्हे, तर प्रेक्षकांनाही मिळणार आहे.

पुणे ग्रँड टूरच्या आगमनासोबत भारत सायकलिगंमध्ये एक नवीन अध्याय लिहिणार आहे. सायकलिंग संस्कृती निर्माण करण्याच्या तसेच या क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्याच्या आणि नवी उमेद निर्माण करण्याच्या दिशेने हे टाकलेले हे एक पाऊल आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *