Pune News : इन्स्पेक्टरच्या खुर्चीत ऐटीत बसला, पोलीस कर्मचाऱ्याचा फोटो लिक; पण फोटो व्हायरल झालाच कसा? याच्या तपासावर भर

Pune News : पुण्यातील बाणेर पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये जात त्यांच्या खुर्चीवर बसून काही फोटो काढले होते. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी चौकशी आदेश काढले होते. मात्र, इन्स्पेक्टरच्या खुर्चीत बसून पोलिस ठाण्याचा 'अर्थ'पूर्ण कारभार पाहणाऱ्या 'त्या' पोलिस महाशयावर कारवाई करण्याऐवजी, त्याचा 'तो' फोटो लिक झाला कसा? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. सध्या या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला असून, यासाठी पोलिस ठाण्याचे पथक कामाला लागल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पोलीस पाडाळे असे पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पाडाळे पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये जातात, नंतर निरीक्षकांच्या खुर्चीवर बसून फोटोशूट करतात. या बाबतचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले असून, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबतच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

परंतु, याप्रकरणी कुणावरही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच पोलीस कर्मचारी प्रवीण पाडाळे यांना जाब विचारण्याचे सोडून हा सीसीटीव्ही फुटेज आणि फोटो कुणी व्हायरल केले, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. यासाठी पोलिस ठाण्याचे पथक कामाला लागल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

एकीकडे ६४ वसुलीवाल्यांना पोलिस आयुक्तांनी गणवेश परिधान करून रस्त्यावर उभे केले होते. असे असताना या वजनदार कर्मचाऱ्यावर मात्र कोणतेच कारवाई होताना दिसून येत नाही आहे. त्यामुळे या पोलीस कर्मचाऱ्याला कुणाचा पाठिंबा आहे का? या घटनेबाबत अद्याप कारवाई झालेली का नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply