Pune : स्कूल बसमध्ये चिमुकलींवर लैंगिक अत्याचार प्रकरण, वंचितच्या ९ कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा

Pune : पुण्यामध्ये दोन चिमुकल्या शाळकरी मुलींवर स्कूल व्हॅनमध्ये लैंगिक अत्याचार करण्यात आले होते. या घटनेमुळे पुणेकरांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या वंचितच्या कार्यकर्त्यांनी ज्या स्कूलव्हॅनमध्ये ही घटना घडली होती त्याची तोडफोड केली होती. याप्रकरणी आता पुणे पोलिसांनी कारवाई करत वंचितच्या ९ कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पुणे पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेनंतर आरटीओ प्रशासन खडबडून जागे झाले असून त्यांना शाळांना महत्वाच्या सूचना दिल्या आहेत.

शाळकरी मुलींवर अत्याचार प्रकरणात जप्त केलेल्या स्कूलव्हॅनची तोडफोड केल्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह ९ जणांविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अत्याचाराच्या घटनेनंतर संतप्त कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत शुक्रवारी वाहनाची तोडफोड केली होती. वंचित बहुजन आघाडी माथाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष विशाल कसबे, धर्मराज यादव लांडगे, मिलिंद हरिदास सरवदे, विशाल वंजारी, सचिन भडकवाड यांच्यासह ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वानवडी पोलिस ठाण्यातील हवालदार जोतिबा कुरळे यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pune Crime: पुणे पुन्हा हादरले! ५ वर्षांच्या चिमुकल्यावर अनैसर्गिक अत्याचार, कोंढव्यातील संतापजनक प्रकार

पुण्यातील वानवडीत झालेल्या प्रकरणानंतर आरटीओ प्रशासन खडबडून जागे झाले आहे. पुणे शहरातील स्कूलबस, व्हॅनवर आरटीओने कारवाईचा बडगा सुरू केला आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून स्कूलबस आणि व्हॅनची धडक तपासणी मोहीम सुरू झाली आहे. नियमभंग करणाऱ्या वाहनांवर आरटीओकडून कारवाई केली जात आहे. आरटीओकडून शहरात एकूण १० पथके नियुक्त करण्यात आली असून त्यात एकूण २० अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. शालेय विद्यार्थी वाहतूक नियमावलीचे पालन वाहतूकदारांकडून होत आहे का? याची तपासणी या पथकांकडून केली जाणार आहे.

वानवडीमधील घटनेनंतर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी शाळा प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. शाळा प्रशासनाने कर्मचारी किंवा स्कूलव्हॅन चालक ठेवताना चारित्र्य पडताळणी करुन घ्यावे. शाळा व्यवस्थापनात काही त्रुटी आढळल्यास थेट कारवाई करण्यात येणार आहे. पुण्यातील वानवडी भागात दोन चिमुरड्या मुलीवर स्कूलव्हॅन चालकनेच लैंगिक अत्याचार केला होता. याप्रकरणी स्कूलव्हॅन चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply