
Pune : पुण्यात दिवसेंदिवस गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यातच पुरंदर तालुक्यातील सासवड येथे एका आईस्क्रीम दुकानाच्या मालकावर तीन अज्ञात हल्लेखोरांनी जवळून गोळीबार केला. या गोळीबारामध्ये आईस्क्रीम दुकानमालक गंभीर जखमी झाला आहे. आठ महिन्यांपूर्वीच्या वादातून ही घटना घडली असल्याचे पोलिसांकडून प्रथमदर्शनी सांगण्यात आले आहे. या घटनेमुळे सासवड परिसरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. राहुल टिळेकर असं जखमी झालेले व्यक्तीचे नाव असून त्याच्यावर पुण्यातील हडपसर येथील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे.
पोलिसांनी दिेलेल्या माहितीनुसार, पुरंदर तालुक्यातील सासवड येथे गुरुवारी दुपारी साडे तीनच्या सुमारास तीन हल्लेखोर काळ्या गाडीतून आले. त्यांनी टिळेकर यांच्या दुकानासमोर गाडी लावून गोळीबार करण्यास सुरुवात केली. गोळीबारात एक गोळी टिळेकर यांच्या पोटात शिरली. त्यात टिळेकर हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या पोटातील गोळी काढण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
|
|
राहुल टिळेकरांनी हल्ला करणार्या व्यक्तीमध्ये गेल्या आठ महिन्यांपासून वाद सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. त्यातूनच हा प्रकार घडला असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. याबाबत नातेवाईकांकडून तक्रार दाखल करण्यात आली असून याबाबत तपास केला जात आहे. पुण्यामध्ये दिवसेंदिवस कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे उडताना पाहायला मिळत आहे. या घटनेमुळे सर्वसामान्यांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचं पाहायला मिळत आहे. या घटनेमुळे सासवड परिसरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
IAS पूजा खेडकरांच्या आईला अटक
दरम्यान, आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना अखेर अटक करण्यात आली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी मनोरमा खेडकर यांना महाड येथून अटक केली आहे. शेतकऱ्यांना बंदूक दाखवत धमकावल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्याचप्रकरणात त्यांना अटक करण्यात आली आहे.
मनोरमा खेडकर यांना महाडमधील हॉटेलमधून अटक करण्यात आली असून सध्या स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करुन पोलिस त्यांना पुण्याला घेऊन येत आहेत. मनोरमा खेडकर यांना पुण्यात आणल्यानंतर त्यांची चौकशी केली जाईल.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

























Subscribe to my channel

