Pune News : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर

Pune News : शहरातील L3 लॉऊन्ज पब प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही तरुणांनी ड्रग्जचं सेवन केल्याची कबुली दिली आहे. त्या तरूणांची ओळख पटली असून या दोन्ही तरुणांची ओळख अशाच पार्ट्यांमध्ये झाल्याचं समोर आलं आहे. यातील एक तरूण हा मुंबईतील गोरेगावचा असल्याची माहिती आहे. तर दुसरा तरूण हा पुण्यातील मुंढवा भागातील आहे. विशेष म्हणजे दोन्ही तरूण हे उच्चशिक्षित असून एकटा आर्किटेक्ट आहे तर दुसरा सॉफ्टेवअर इंजिनिअर आहे. 

पुण्यातील एफसी रोडवरील L3 बार मधील एक व्हिडीओ समोर आला होता. त्या व्हिडीओमध्ये दोन तरूण ड्रग्ज घेत असल्याचं दिसत होतं. या व्हिडीओनंतर पोलिसांनी दोघांचा तपास घेत त्यांना ताब्यात घेतलं. त्यांच्या चौकशीदरम्यान त्यांनी ड्रग्ज सेवन केल्याची कबुली दिली. त्यामुळे L3 लाउंज पबमध्ये ड्रग्ज घेतले जात होते यावर शिक्कामोर्तब झालं. 

Vidhan Parishad Election : मुंबईसह राज्यातील ४ विधानपरिषदेसाठी आज मतदान; महाविकास आघाडी की महायुती, कुणाचं पारडं जड?

मुंबईचा तरूण ड्रग्ज घेऊन पुण्याला आला

मुंबईत राहणारा तरूण हा आर्किटेक्ट आहे आणि तो मेफेड्रॉन घेऊन पुण्यात आला होता. तर दुसरा तरूण हा पुण्यातील मुंढव्यातील असून तो सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. या दोघांची ओळख एका पार्टीमध्ये झाली होती. 

हे दोघे शनिवारी संध्याकाळी एकत्र आले आणि रात्री एल थ्री या पबमध्ये गेले. हे दोघे द कल्ट या पबमध्ये आधी झालेल्या पार्टीत सहभागी झाले नव्हते. द कल्ट या पबच्या मालकावर देखील पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. सुरुवातीला द कल्ट या पबमध्ये पार्टी झाली आणि नंतर मध्यरात्री दीडनंतर पुढची पार्टी ही एल थ्रीमध्ये सुरू झाली.

यातील एका तरूणाला मुंबईतून अटक करण्यात आली तेव्हा त्याच्याकडे पाच ग्रॅम मेफेड्रॉन आढळून आले. हे मेफेड्रॉन त्यानं मुंबईतून खरेदी केले होते. त्यामुळे पुण्यासोबतच मुंबईमध्येही मेफेड्रॉन ड्रग्जची विक्री होत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास आता पुणे पोलिसांसोबत मुंबई पोलिसांकडूनही केला जाण्याची शक्यता आहे. 

नेमकं काय आहे प्रकरण?

पुण्यातील सर्वात व्यस्त रस्त्यांपैकी एक असलेल्या एफ सी रोडवरील या लिक्विड लेझर लाउंज या पबमधे ड्रग्ज घेतलं जात असल्याचं उघड झाल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झालेत . पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत या हॉटेलचा , मालक , मॅनेजर , कर्मचारी आणि पार्टीचे आयोजन करणाऱ्या व्यक्तींसह आठ जणांना अटक केलीय. रात्री एक वाजेपर्यंत पब सुरु ठेवण्यास परवानगी असताना पाठीमागच्या दराने रात्री दीड वाजता पन्नास जणांना या पबमधे प्रवेश देण्यात आला . या पार्टीमध्ये आलेले पन्नास जण शनिवारी संध्याकाळी हडपसरमधील कल्ट या पबमधे पार्टीसाठी जमले होते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply