Pune : पुण्यातील ६० ते ७० रुग्णालयांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी; ई-मेल प्राप्त होताच पोलिसांची धावपळ

Pune : पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलसह ६० ते ७० रुग्णालयांमध्ये बॉम्ब ठेवलाय, असा धमकीचा ई-मेल अज्ञात व्यक्तीने पाठवला. यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीने डेक्कन परिसरात धाव घेऊन हॉस्पिटलची तपासणी केली. यावेळी बॉम्बशोधक पथकही होते. तपासणीनंतर कुठलीही बॉम्बसदृश्य वस्तू आढळून आली नाही.

त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. बॉम्ब ठेवल्याची धमकी दिल्याचा हा खोडकरपणा नेमका कुणी केला? याचा तपास सध्या पुणे पोलिसांकडून केला जात आहे. सध्या पोलिसांचे पथक रुग्णालय परिसरात ठाण मांडून आहेत.

Pimpri : पिंपरीत निम्म्या मालमत्ताधारकांकडूनच करभरणा, आतापर्यंत ३६२ कोटी जमा; ३० जूनपर्यंत मुदत

तसेच ज्या ई-मेलवरून रुग्णालयांना धमकी आली, त्याचे तांत्रिक विश्लेषण करण्याचे काम सुरू आहे. पुणे शहरातील डेक्कन परिसरात सह्याद्री हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलच्या ई-मेलवर सोमवारी (ता. १७) एका अज्ञात व्यक्तीने बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा मेल पाठवला. यामुळे रुग्णालयातील डॉक्टर चांगलेच धास्तावले.

त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांची बॉम्बशोधक पथकासह रुग्णालय गाठले. यावेळी हॉस्पिटलचा कानाकोपरा तपासण्यात आला. मात्र, कुठलीही बॉम्बसदृश्य वस्तू आढळून आली नाही. दरम्यान, धमकी देणाऱ्या व्यक्तीने एकाचवेळी शहरातील ६० ते ७० रुग्णालयांने हे धमकीचे मेल पाठवले होते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply