Pune News : बालेवाडीतील पदपथ, मैदानांवर मांसाचे तुकडे; परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर

Pune News :येथील साई चौक ते मधुबनसोसायटीजवळील पदपथावर आणि याच भागातील मोकळ्या मैदानावर दररोज मटण व चिकनच्या दुकानातील शिल्लक मांसाचे तुकडे आणि अवशेष सर्रास आणून टाकले जातात. त्यामुळे या परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून भटक्या कुत्र्यांचा वावर ही मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहे.

बाणेर बालेवाडी परिसराचा विकास सध्या झपाट्याने होत आहे. त्यामुळे या भागात मोठ्या दुकानांबरोबरच टपरीवजा स्वरूपामध्ये भाजीपाला, किराणा व चिकन-मटणाची दुकाने मोठ्या प्रमाणात आहेत. अशा चिकन-मटण दुकानांमधून ओला कचरा महापालिकेच्या गाडीमध्ये देणे आवश्यक असते, पण हा कचरा तिथे न देता, दुकानातील शिल्लक मांसाचे तुकडे रात्रीच्या अंधारामध्ये रस्त्याच्या कडेला किंवा मोकळ्या मैदानामध्ये आणून टाकले जातात.

Virar News : अर्नाळा समुद्रात बोट बुडाली, एकाचा मृत्यू; ११ जणांना वाचवण्यात यश

बाणेर बालेवाडी परिसराचा विकास सध्या झपाट्याने होत आहे. त्यामुळे या भागात मोठ्या दुकानांबरोबरच टपरीवजा स्वरूपामध्ये भाजीपाला, किराणा व चिकन-मटणाची दुकाने मोठ्या प्रमाणात आहेत. अशा चिकन मटण दुकानांमधून ओला कचरा महापालिकेच्या गाडीमध्ये देणे आवश्यक असते, पण हा कचरा तिथे न देता, दुकानातील शिल्लक मांसाचे तुकडे रात्रीच्या अंधारामध्ये रस्त्याच्या कडेला किंवा मोकळ्या मैदानामध्ये आणून टाकले जातात.

हे मांस खाण्यासाठी कुत्री जमा होतात. या भागातून ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास होतो. मोठ्या प्रमाणामध्ये दुर्गंधीचा सामना करावा लागतो. त्याचप्रमाणे येथील भटकी कुत्री कधी कधी नागरिकांच्या अंगावर धावून जातात. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशा प्रकारे रस्त्यावर मांसाचे तुकडे टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.

मी दररोज सकाळी फिरायला बाहेर जात असतो. त्यावेळी रस्त्याच्या कडेला किंवा पदपथावरच मोठ्या प्रमाणामध्ये चिकनचे पंख, मांसाचे तुकडे पडलेले दिसतात. कुत्री हे मास इकडे तिकडे घेऊन जातात. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणामध्ये दुर्गंधी पसरत असून त्याचा खूप त्रास होतो. महापालिकेने अशा नागरिकांवर कारवाई करावी.

या भागात एका एनजीओकडून विनामूल्य चिकन-मटण दुकानातील ओला कचरा जमा करण्यासाठी गाडी पाठविली जाते. तरी असा प्रकार घडतो आहे. त्यामुळे या भागातील चिकन-मटणच्या दुकानावर आजूबाजूच्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवून दोषींवर कारवाई केली जाईल.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply