
Pune News : पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि महाआघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचार खर्चाचा ताळेबंद उमेदवारांच्या खर्च तपासणीच्या दुसऱ्या तपासणीत जुळत नसल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दुसरी नोटीस सोमवारी पाठविली. मोहोळ, धंगेकर यांच्यासह दोन अपक्ष उमेदवारांनाही नोटीस पाठविण्यात आली.
पुणे लोकसभा मतदारसंघासाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे. या मतदार संघातून ३५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. उमेदवारांनी केलेल्या प्रचार खर्चाची दुसरी तपासणी सोमवारी पार पडली. धंगेकर यांनी पहिल्या टप्प्यात सादर केलेल्या २७ लाख ५९ हजार ६७७ रुपयाचा खर्च सादर केला. त्यामध्ये नऊ लाख पाच हजार १८ रुपयांची तफावत आली होती. महायुतीचे मोहोळ यांनी ३३ लाख १३ हजार ४०२ रुपयांचा खर्च सादर केला होता, त्यामध्ये २७ लाख २४ हजार २३२ रुपयांची तफावत आली होती. त्यामुळे धंगेकर, मोहोळ यांना पहिली नोटीस पाठविण्यात आली होती. या दोन्ही उमेदवारांना ६ मेपर्यंत तफावत काढण्यात आलेल्या खर्चाचा खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते.
|
|
दरम्यान, दुसऱ्या टप्प्यातील प्रचार खर्च तपासणीत धंगेकर यांचा आतापर्यंत ३८ लाख ८९ हजार ३९२ रुपये प्रचार खर्च झाला आहे. मात्र धंगेकर यांच्या प्रचार खर्चात ११ लाख ६७ हजार ७०९ रुपयांच्या खर्चाची तफावत आली आहे. मोहोळ यांचा आतापर्यंत ४९ लाख ३४ हजार ५८ रुपयांचा खर्च झाला आहे. त्यांच्या खर्चात ३६ लाख २७ हजार ५८४ रुपयांची तफावत येत आहे. त्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी मोहोळ, धंगेकर यांना तातडीने हिशेब सादर करावा, अशी दुसरी नोटीस पाठविली आहे. अपक्ष उमेदवार सचिन धनकुडे यांनी निवडणूक प्रचार खर्चासाठी स्वतंत्र बँक खाते अद्याप उघडले नसल्याने आणि अपक्ष उमेदवार सचिन चोरमले हे पहिल्या आणि दुसऱ्या उमेदवार खर्च तपासणीला अनुपस्थित राहिले. परिणामी धनकुडे, चोरमले यांना प्रचार खर्च सादर करण्याबाबत डॉ दिवसे यांनी नोटीस काढली.
शहर
- मुंबई: 'समाजाला अशा धक्क्यांची गरज असतेच'; बीएमसी प्रमुख अश्विनी भिडे यांनी अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडेंच्या कामगिरीचे केले कौतुक
- मुंबई: महर्षी कर्वे रोडवरील आयकर भवनाच्या बेसमेंटमध्ये भीषण आग; ऊपरी मजल्यांवरील नागरिकांची तातडीने सुटका
- पुणे: कर्ज घेऊन शिक्षण पूर्ण केले, तरी नोकरीची शाश्वती नाही, ही आजच्या व्यवस्थेची शोकांतिका; हर्षवर्धन सपकाळ
- मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ! मतदार यादीतून तब्बल २ कोटी नावे वगळल्याचा रोहित पवार यांचा गंभीर दावा, निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर खळबळ
महाराष्ट्र
- मुंबई: 'समाजाला अशा धक्क्यांची गरज असतेच'; बीएमसी प्रमुख अश्विनी भिडे यांनी अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडेंच्या कामगिरीचे केले कौतुक
- मुंबई: महर्षी कर्वे रोडवरील आयकर भवनाच्या बेसमेंटमध्ये भीषण आग; ऊपरी मजल्यांवरील नागरिकांची तातडीने सुटका
- पुणे: कर्ज घेऊन शिक्षण पूर्ण केले, तरी नोकरीची शाश्वती नाही, ही आजच्या व्यवस्थेची शोकांतिका; हर्षवर्धन सपकाळ
- गोवा: ‘लगे रहो मुन्नाभाई’ फेम अभिनेता अश्विन मुशरनच्या कारने बाप-लेकाला उडवले; गोव्यातील अपघातानंतर मदतीऐवजी स्थानिकांसोबत घातला वाद
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोंदिया: स्वातंत्र्यदिनी काळाचा घाला! अंघोळीची हौस बेतली जिवावर, गोंदियातील ढासगड येथे दोन तरुण वाहून गेले
- लखनऊ: शिक्षणाचा खेळ; जेन-झीनंतर आता जेन-अल्फा आक्रमक; लखनऊमध्ये विद्यार्थ्यांचे रस्त्यावर उतरून आंदोलन
- नवी दिल्ली: नितीन नबीन यांच्या टीममध्ये 'जेन झी'ची एन्ट्री; भाजपात मोठे बदल, महाराष्ट्रातून कुणाला संधी?
- अरुणाचल प्रदेश: मुसळधार पावसामुळे निसर्गाचा कोप; अचानक आलेल्या पुरात लष्कराचे ५ जवान बेपत्ता, तर भूस्खलनात ४ मजुरांचा मृत्यू



























Subscribe to my channel




