Pune : चक्क मोबाइल टॉवरची चोरी, मोबाइल टॉवर झाले गायब; टोळीला अटक

पुणे : बंद अवस्थेतील मोबाइल टॉवरचे साहित्य चोरणार्‍या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून १३ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला. सहा जिल्ह्यातील दहा मोबाइल टॉवरची चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात पथकाला यश आले आहे. टोळीमध्ये टॉवर कंपनीतील दोन अधिकार्‍यांचा सहभाग असल्याचेही निष्पन्न झाले आहे.

रमेश मल्लाप्पा गरसंगी (वय ३३ रा. मळघन ता बसवन बागेवाडी जि.विजयपुरा कर्नाटक) प्रशांत वामन यादव (वय ३१ रा.वडकी ता. हवेली मूळ रा. हर्णे ता. पुरंदर), सुहास श्रीराम लाड (वय ४० रा.मांजरी बु ) जावेद हमीदुल्ला खान (वय ३३ रा. भेकराईनगर, फुरसुंगी ) आणि सचिन गणपत कदम (वय ४१ रा. कोंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

जी. टी. एल. इन्फास्ट्रक्चर कंपनीच्या रांजणगावातील पाचंगे वस्ती परिसरातून बंद अवस्थेतील मोबाइल टॉवरची चोरीची घटना २८ जानेवारीला घडली होती. चोरट्यांनी तब्बल १५ लाखांचे साहित्य चोरुन नेले होते. गुन्हयाची व्याप्ती मोठी असल्यामुळे गुन्हयाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून केला जात होता. पथकाने तांत्रिक विश्लेषणाचा आधारे आरोपींना कर्नाटक राज्यातून आणि पुणे जिल्हा परीसरातून पाचजणांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून १३ लाख ५० हजारांचा ऐवज जप्त केला . त्यांनी जी. टी. एल. कंपनीचे सातारा, रत्नागिरी, सांगली, पुणे, बीड, रायगड अशा सहा जिल्हयातील १० मोबाइल टॉवरची चोरी केल्याची कबुली दिली.

अटक केलेल्या टोळीत जी.टी.एल इन्फास्ट्क्चर कंपनीत काम करणार्‍या दोघा अधिकार्‍यांचा सहभाग आहे. २००८ मध्ये कंपनी बंद झाल्यानंतर संबंधित मोबाइल टॉवरची चोरीचा कट त्यांनी रचला. त्यानंतर इतर साथीदारांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली. ही कामगिरी पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर,गणेश जगदाळे, अभिजीत सावंत, तुषार पंदारे, सचिन घाडगे, राजु मोमीन, मंगेश थिगळे, जनार्दन शेळके, चंद्रकांत जाधव, अजित भुजबळ, हनुमंत पासलकर, हेमंत विरोळे, अक्षय सुपे आदींनी ही कारवाई केली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply