Pune News : पिंपरीत विद्यार्थ्याला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन पोलिसांनी घेतली पाच लाखांची खंडणी

Pune News : महाविद्यालयीन तरुणाला गांजाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून कारागृहात घालण्याची धमकी देत पाच लाख रुपये उकळणा-या देहूरोड पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी अनिल चौधरी, अमन शेख, हुसेन डांगे, मोहम्मद अहमेर मिर्झा यांना अटक केली आहे. तर, पोलीस नाईक हेमंत गायकवाड, पोलीस शिपाई सचिन शेजाळसह शंकर गोरडे, मुन्नास्वामी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वैभवसिंग मनीषकुमार सिंग चौहान (वय १९, रा. किवळे)

Accident News : पुण्यातील नवले पुलाजवळ भीषण अपघात; भरधाव डंपरने खासगी बसला उडवलं, थरारक घटना

फिर्यादी चौहान हा किवळे येथील एका प्रतिष्ठित महाविद्यालयात शिक्षण घेतो. तो महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहतो. देहूरोड पोलीस ठाण्यातील दोन अंमलदार आणि अन्य आरोपींनी मिळून चौहानकडून पैसे उकळण्याचा कट रचला. त्यानुसार आरोपींनी १० फेब्रुवारी रोजी दुपारी किवळे येथील एका कॅफे मधून त्याचे अपहरण केले. तेथून मायाज लॉज, गहुंजे स्टेडियम आणि तेथून देहूरोड पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

चौहान याला गांजाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून कारागृहात घालण्याची धमकी देण्यात आली. हा सगळा प्रकार टाळायचा असेल तर २० लाख रुपयांची मागणी करण्यात आली. पोलिसांसह आरोपींच्या धमकीला घाबरलेल्या चौहानने गुगल पे आणि नेट बँकिंगद्वारे आरोपींना चार लाख ९८ हजार रुपये दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. मात्र, संबंधित पोलिसांवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. देहूरोड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त मुगुट पाटील हे तपास करीत आहेत.

मूळ रा. झारखंड) या विद्यार्थ्याने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply