Pune News : ललित कला केंद्र प्रकरणात पोलिस उपनिरीक्षक निलंबित

Pune News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्राच्या आवारात तोडफोड झाल्याच्या घटनेच्या वेळी बंदोबस्तास असलेल्या पोलिस उपनिरीक्षकास हलगर्जीपणा केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. याबाबत अतिरिक्त पोलिस आयुक्त (पूर्व विभाग) रंजनकुमार शर्मा यांनी निलंबनाचे आदेश दिले आहेत.

सचिन शंकर गाडेकर असे निलंबित केलेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. गाडेकर चतु:शृंगी पोलिस ठाण्यात नियुक्तीस आहेत. ललित कला केंद्राच्या आवारात शनिवारी सायंकाळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून करून गोंधळ घातला.

Gold Smuggling In Mumbai: पॅनकेक पावडरमधून सोन्याची तस्करी; मुंबई विमानतळावरून १.३७ कोटींचे सोने जप्त, कस्टम विभागाची कारवाई

तसेच, ललित कला केंद्राच्या खिडकीच्या काचांची आणि कुंड्यांची तोडफोड करून फलकावर शाईफेक केली. या वेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर बंदोबस्तावरील पोलिस उपनिरीक्षक गाडेकर यांनी घटनेची योग्य दखल घेतली नाही. तसेच, याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक, खडकीच्या सहायक पोलिस आयुक्त आणि पोलिस उपायुक्त यांच्यासह नियंत्रण कक्षाला तातडीने माहिती दिली नाही.
 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply