Pune : ब्रेक फेल की घातकी नवले ब्रीज? भीषण अपघाताचं नेमकं कारण काय? RTOच्या अहवालात धक्कादायक तपशील

Pune : पुण्यातील नवले पुलावर १३ नोव्हेंबर रोजी कंटेनरचा भीषण अपघात झाला होता. ताबा सुटलेल्या कंटेनरनं १२ ते १५ वाहनांना टक्कर दिली होती. या धडकेत कार आणि कंटेनरला आग लागली होती. नवले पुलावरील या दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला, तर १५ जण जखमी झाले. नवले पुलावर होणाऱ्या अपघातामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

नवले ब्रीजवर वारंवार घडणाऱ्या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग प्रशासनचा (National Highways Authority) दशक्रिया विधी या पुलावर विरोधी पक्षातील नेत्यांनी केला. दरम्यान पुलावर अपघात का घडतात याबाबत रस्ता सुरक्षा समितीनं बैठक सुद्धा घेतली. आता हा अपघात कसा घडला होता, कशामुळे झाला याबाबत आरटीओनं (RTO) अहवाल दिलाय.

Solapur : मोठी बातमी! देवदर्शनासाठी निघालेल्या भक्तांच्या गाडीला भीषण अपघात, 5 जण जागीच ठार, 8 जखमी

नवले पुलाजवळीच अपघात हा अतिवेगामुळंच झाल्याचा आरटीओचा प्राथमिक अहवाल समोर आलाय. अपघात प्रकरणी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ)ने तपासणी करत अहवाल पूर्ण केलाय. हा अपघात ड्रायव्हरच्या चुकीमुळे झालाय. याबाबतचा अंतिम अहवाल तयार करण्याचे काम RTO विभागाकडून सुरू आहे. या अहवालात अपघातग्रस्त वाहनाचा वेग जास्त असल्याचं सांगण्यात आलंय. तसेच कंटेनर चालकानं वाहन न्युट्रल केल्याची शक्यता अहवालात वर्तवण्यात आलीय. कंटेनरचा वेग जास्त असल्यामुळेच हा अपघात झाला.

नवले पुलाजवल 13 नोव्हेंबरला एका भरधाव कंटेनरने चालक आणि वाहनांना उडवलं होतं. त्यानंतर एका कारला धडक दिल्यानंतर ती कार पुढे अडकून कंटेनर ट्रकला धडकली. यामध्ये आग लागून कार आणि कंटेनरमधील आठ जणांचा मृत्यू झाला होता.

पुणे-सातारा रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी ‘आरटीओ’ विभाग सतर्क झालंय. अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी ‘आरटीओ’ने रस्त्यावर दोन भरारी पथकांची नियुक्ती केलीय. यातील एक भरारी पथक वाहनांची तपासणी करेल. तसेच चालकाने मद्यप्राशन केले आहे की नाही, याची तपासणी करेल. दुसरे पथक जड वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांचे समुपदेशन करेल.

आता चालकांना अपघातप्रवण भागाविषयी माहिती दिली जाणार आहे. पुढे तीव्र उतार आहे, वाहन हळू चालवा, न्यूट्रलवर वाहन चालवू नका, असे समुपदेशन केले जाणार आहे. ‘आरटीओ’चे दोन्ही पथक खेड शिवापूर टोलनाक्याजवळ थांबणार आहेत.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *