Pune Navale Bridge : नवले पुलावरील अपघात रोखण्यासाठी प्रशासन सज्ज; आज होणार महत्त्वाची बैठक

Pune News : मुंबई-बेंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवले पुलाजवळ झालेल्या अपघाताची चौकशी करण्यासाठी नवले नेमलेल्या समितीचा अहवाल तयार करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.

नवले पुलावरील अपघातांच्या कारणांचा अहवाल अखेर तयार करण्यात आला आहे. नवले पुलावर सतत होणाऱ्या अपघाताची तीव्रता लक्षात घेत यापूर्वीच वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती. या समितीने आता एक अहवाल तयार केला असून तो अहवाल प्रशासनासमोर देखील ठेवण्यात आला आहे.

पोलीस उपयुक्तांसोबतच सेव्ह लाइफ फाउंडेशन या खाजगी संस्थेने नवले पुलावर होणाऱ्या अपघातांच्या कारणासाठीचा एक अहवाल तयार केला आहे. संस्थेने दिलेल्या अहवालाच्या आधारे बऱ्याच ठिकाणी रम्बल स्ट्रिप्स लावणे, रस्त्यांच्या बाजूचे अतिक्रमण काढणे, दोन्ही बाजूस पट्टी लावणे, पोलिसांचा बंदोबस्त वाढविणे, वेग मर्यादेवर नियंत्रण करणे आदी उपायोजना या अहवालात सुचवण्यात आल्या आहेत.

याच अनुषंगाने जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आज एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. गेल्या रविवारी या महामार्गावरील स्वामिनारायण मंदिराजवळ हा अपघात झाला होता. त्यामध्ये दोन जणांना आपला जीव गमवावा लागला.

या भागातील अपघातांची संख्या वाढत आहेत. वारंवार होणाऱ्या अपघातांची संख्या विचारात घेता आणि रविवारी झालेल्या अपघाताची तीव्रता विचारात घेता या घटनेची चौकशी करण्यासाठी वाहतूक शाखचे पोलिस उपायुक्त यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले होते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply