Pune : पुणेकरांसाठी खुशखबर! मोदी सरकारकडून पुणे मेट्रोच्या दोन महत्त्वाच्या मार्गिकांना हिरवा कंदील

Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पुणे मेट्रो रेल प्रकल्पाच्या टप्पा 2 (Phase-2) मधील मार्गिका 4 (Line 4) आणि मार्गिका 4 अ (Spur Line 4A) याला मान्यता देण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे पुणेकरांची वाहतुकीची समस्या कमी होण्यास मदत होणार आहे. याशिवाय, मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने आज ७ हजार २८० कोटी खर्चाच्या रेयर अर्थ मॅग्नेट निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठीच्या योजनेला देखील मान्यता दिली आहे. असे माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले आहे.

तर मोदी सरकारने पुणे मेट्रोबाबत घेतलेल्या या निर्णयामुळे शहराच्या विकासाला नवी गती मिळणार आहे. मार्गिका 4 (खराडी ते खडकवासला) ची लांबी 25.52 किमी असून, यात 22 उन्नत (Elevated) स्थानके असतील. हा मार्ग खराडी, हडपसर, स्वारगेट मार्गे खडकवासला पर्यंत असणार आहे.

Pune : महिलेचा पुरूषावर अत्याचार अश्लील व्हिडीओ काढून ब्लॅकमेल, पुण्यात खळबळजनक घटना

मार्गिका ४अ (नळ स्टॉप-वारजे-माणिक बाग) ही 6.12 किमी लांबीची असून, यात 6 उन्नत स्थानके असतील. या दोन्ही मार्गिकांची एकूण लांबी 31.64 किमी आणि स्थानकांची एकूण संख्या 28 आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी 9857.85 कोटी खर्च अपेक्षित असून, पाच वर्षांमध्ये हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे

या नव्या मेट्रो मार्गामुळे पुणे शहरातील पूर्वेकडील मध्यवर्ती आणि पश्चिमेकडील महत्त्वाचे भाग थेट जोडले जातील, ज्यामुळे नागरिकांचा प्रवास अधिक जलद आणि सोपा होईल. या नवीन मार्गिका पुणे शहराच्या तीन मुख्य दिशांना (पूर्व, मध्य आणि पश्चिम/दक्षिण-पश्चिम) जोडतील, ज्यामुळे शहरातील नागरिकांना कोणत्याही दिशेला प्रवास करणे सोपे होणार आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *