“माझ्या मना बन दगड”, चंद्रकांत पाटलांनी एकनाथ शिंदेंबाबत केलेल्या वक्तव्यावर सोशल मीडियावर जोरदार प्रतिक्रिया

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी (२३ जुलै) पनवेलमधील भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत आपण मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केल्याचं वक्तव्य केलं. त्यानंतर राजकीय वर्तुळातून त्यावर अनेक प्रतिक्रिया आल्या. त्यामुळे भाजपाने चंद्रकांत पाटलांच्या भाषणाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावरून हटवला. मात्र, त्यानंतरही सोशल मीडियावर चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यावर जोरदार प्रतिक्रिया येत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वर्पे म्हणाले, “भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनातील खदखद बाहेर काढली. भाजपाला मुख्यमंत्री पद न मिळाल्याचे दुःख किती मोठे आहे हे त्यांनी बोलून दाखवले. त्यांची अवस्था ‘ऐन रात्री होतील भास; छातीमध्ये अडेल श्वास, विसर त्यांना, दाब कढ; माझ्या मना बन दगड’ अशी झाली आहे.”

 

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

इतर

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *