
औरंगाबाद - गुंठेवारी वसाहतीमधील बेकायदा बांधकामे नियमितीकरणाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आतापर्यंत आठ हजार ३७२ मालमत्ता नियमित झाल्या आहेत. शहरी भागातील बेकायदा बांधकामे नियमित करण्यासाठी राज्य सरकारने गुंठेवारी अधिनियमात सुधारणा केली. यानुसार ३१ डिसेंबर २०२० पर्यंतची बेकायदा बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी शहरातील मालमत्ता नियमित करण्यासाठी गुंठेवारी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार नगररचना विभागाने झोननिहाय गुंठेवारी पथके तयार केली. महापालिकेने वास्तुविशारदांची नियुक्ती करीत रेडिरेकनर दरानुसार मालमत्ता बेकायदा बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेतला. निवासी मालमत्तांसाठी १५०० चौरस फुटापर्यंत रेडिरेकनर दराच्या ५० टक्के शुल्क तर व्यावसायिक मालमत्तांसाठी संपूर्णपणे रेडिरेकनर दर आकारला जात आहे.
नगररचना विभागाचे उपसंचालक ए. बी. देशमुख यांनी सांगितले, की गुंठेवारी शुल्कातून महापालिकेने शंभर कोटींचा आकडा पार केला आहे. मुंबई वगळता औरंगाबाद महापालिका शंभर कोटींचा आकडा पार करणारी पहिली महापालिका ठरली आहे. शहरातील गुंठेवारी भागात राहणारे नागरिक आणि सातारा-देवळाई भागातील मालमत्ताधारकांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याने वर्षभरात शंभर कोटींचा आकडा पार झाला आहे.
संचिका दाखलचे प्रमाण घटले
शहरात २०२० पर्यंतची किमान २५ ते ३० हजार बेकायदा बांधकामे असल्याचा अंदाज वारंवार व्यक्त केला जात आहे. त्यानुसार महापालिकेने उद्दिष्ट ठेवले होते. पण अद्याप संचिकाचा दहा हजारांचा आकडा पार झालेला नाही. पहिल्या टप्प्यात सातारा-देवळाई परिसरातील नागरिकांनी गुंठेवारीला मोठा प्रतिसाद दिला. पण शहराच्या इतर भागात मालमत्तांधारकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. आतापर्यंत ९ हजार ५९२ संचिकाच दाखल झाल्या आहेत.
शहर
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- भारत-नेपाल सीमेवर नागरिकांना मोठा दिलासा! बालेन शाह सरकारचा मोठा निर्णय; भारतातून आणणाऱ्या सामानावरील शुल्क सवलत पाच पटीने वाढवली!
- ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल ६,००० रुपयांनी स्वस्त!
- शिल्पा शिंदेच्या 'खोट्या' कबुलीजबाबावर हिना खानचा संताप; पंतप्रधान मोदींकडे केली उपरोधिक मागणी!
महाराष्ट्र
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल ६,००० रुपयांनी स्वस्त!
- शिल्पा शिंदेच्या 'खोट्या' कबुलीजबाबावर हिना खानचा संताप; पंतप्रधान मोदींकडे केली उपरोधिक मागणी!
- भोंदूगिरीचा पर्दाफाश! अघोरी पूजा आणि मृत्यूची भीती दाखवून 'भोंदू कमलेश'ने राज्यभरातील भाविकांना लुटले; पोलिसांची दोन पथके रवाना!
गुन्हा
- मलबार हिल पोलिसांत गुन्हा! सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ लिपिकाकडून विवाहितेची १५ लाखांना फसवणूक!
- अमरावती: "तू आम्हाला दारू पाजतो का?"; नकार देताच वाद झाला अन् दगडाने ठेचून तरुणाचा खून;
- पुण्यात रक्तरंजित थरार! आयटीआयच्या विद्यार्थ्याची झोपेत असताना वर्गमित्राकडून निर्घृण हत्या
- रायगड: दागिन्यांच्या हव्यासापोटी वृद्धेचा जीव घेतला! अलिबागमध्ये ८५ वर्षीय महिलेची हत्या; मृतदेह आंबेनळी घाटात फेकला
राजकीय
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
- कर्नाटकात राजकीय भूकंप: मंत्री रामलिंगा रेड्डींचा राजीनामा; खातेवाटपावरून मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप!
- छगन भुजबळ दिल्लीला जाणार? राज्यसभेसाठी नाव निश्चित होण्याची शक्यता, समीर भुजबळांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाची चर्चा!
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा
इतर
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
- अन्न व औषध प्रशासनाचा बीडमध्ये धडाका: तुकाराम मुंढेंच्या आदेशानुसार भेसळयुक्त पदार्थ आणि गुटखा जप्त
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
देश विदेश
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!
- नोएडा शहरासाठी आजची सकाळ अत्यंत भीतीदायक ठरली, कारण शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या भीषण घटना घडल्या आहेत.
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा

























Subscribe to my channel


