
Pune : पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) शहर व पिंपरी-चिंचवडमध्ये सार्वजनिक बससेवा दिली जात असतानाच, मेट्रो स्थानकांपासून लगतच्या परिसरात पूरक सेवा (फीडर सर्व्हिस) देण्यासाठी आता ‘महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन’कडूनही (महामेट्रो) चाचपणी केली जाणार आहे. त्यासाठी खासगी कंपन्यांकडून स्वारस्य प्रस्ताव मागविले असून, यामुळे थेट पीएमपीला स्पर्धक सेवा निर्माण होणार आहे. त्यामुळे हा स्वतंत्र बसचा घाट प्रवाशांसाठी आहे, की ठेकेदारांसाठी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मेट्रोचा पहिला ३१ किमीचा टप्पा पूर्ण कार्यान्वित झाल्यानंतरही गेल्या दोन ते तीन महिन्यांत मेट्रोची प्रवासी संख्या कमी होताना दिसते आहे. प्रवाशांसाठी ‘पीएमपी’कडून मर्यादित स्वरूपात फीडर सेवा दिली जात असल्याने मेट्रोसाठीची स्वतंत्र सेवा सुरू करण्यासाठी महामेट्रोकडून पावले टाकली आहेत. खासगी ठेकेदारासमवेत सार्वजनिक खासगी भागीदारी स्वरूपात (पीपीपी) ही बससेवा कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट असून, त्यासाठी इच्छुक कंपन्यांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.
काय आहे प्रस्ताव?
फीडर बस सेवेसाठी पहिल्या टप्प्यात रामवाडी स्थानकापासून खराडी आणि लोहगाव विमानतळ या दोन मार्गांवर बससेवा सुरू करण्याचा प्रस्ताव आहे.
दोन्ही सेवा एकाच वेळी
सध्या रामवाडी मेट्रो स्थानकापासून दर १५ मिनिटांनी विमानतळासाठी बससेवा उपलब्ध आहे; शिवाय खराडी किंवा खराडी बायपाससाठी दर पाच ते १० मिनिटांनी बस मिळू शकते. याच मार्गावर पुढे मेट्रोचा विस्तार अपेक्षित आहे.
स्वतंत्र बससेवा कशासाठी?
पुणे महानगर परिसरात ‘पीएमपी’कडून आत्ताही ठेकेदारामार्फत बस चालविल्या जातात. त्यामुळे महामेट्रोकडून स्वतंत्र बससेवा सुरू झाल्यास या दोन्ही सेवांची एकमेकांशी स्पर्धा होणार असून, त्यातून प्रवाशांचा फायदा होण्याऐवजी तोटाच होण्याची भीती आहे. महामेट्रोच्या फीडर सेवेसाठी त्यांनी बस उपलब्ध करून दिल्यास पीएमपी त्याचे संचलन करील, असा प्रस्ताव यापूर्वीच देऊनही स्वतंत्र बससेवा सुरू करण्याचे प्रयोजन नक्की काय, याचा उलगडा झालेला नाही. पुणे महानगरासाठी सार्वजनिक वाहतुकीसाठी एकच प्राधिकरण निर्माण करण्यासाठीच आता सरकारला निर्णय घ्यावा लागेल.
शहर
- Chhatrapati Sambhajinagar : ‘खतरों के खिलाडी’ शोसाठी ५० लाखांची फसवणूक; संभाजीनगरच्या प्राध्यापकाची हत्या, जंगलात ‘दृश्यम’ स्टाईल मृतदेह पुरला, ४० दिवसांनी गूढ उकल
- Pune : पुरंदरमध्ये नव्या आयटी पार्कचा प्रस्ताव; हिंजवडीवरील ताण कमी करण्यासाठी विमानतळाजवळ प्रकल्प
- अमर हबीब यांचा कॉलम:यंदाही का करावा लागतो आहे अन्नत्याग?
- Mumbai : एशियाटिकची निवडणूक स्थगित; पात्र उमेदवारांची यादी तयार करण्याचे धर्मादाय आयुक्तांचे निर्देश
महाराष्ट्र
- Mumbai : महाराष्ट्रात एलपीजी संकट! पश्चिम आशियातील युद्धामुळे गॅस पुरवठा विस्कळीत; गॅस एजन्सींना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश
- अमर हबीब यांचा कॉलम:यंदाही का करावा लागतो आहे अन्नत्याग?
- वैद्यकीय शिक्षण मंत्री माधुरी मिसाळ यांचा कॉलम:ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी ‘पल्स वैद्यकीय परिषद’ महत्त्वपूर्ण
- रश्मी बन्सल यांचा कॉलम :थोडीशी काळजी वाटणे चांगले,अवास्तव चिंता काय कामाची?
गुन्हा
- अमर हबीब यांचा कॉलम:यंदाही का करावा लागतो आहे अन्नत्याग?
- वैद्यकीय शिक्षण मंत्री माधुरी मिसाळ यांचा कॉलम:ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी ‘पल्स वैद्यकीय परिषद’ महत्त्वपूर्ण
- Pune : पुण्यात मोठी कारवाई, टीप मिळताच पोलिसांचा सापळा, फॉर्च्युनर थांबताच 40 लाखांचा मुद्देमाल जप्त
- रश्मी बन्सल यांचा कॉलम :थोडीशी काळजी वाटणे चांगले,अवास्तव चिंता काय कामाची?
राजकीय
- मिरज पंचायत समितीत काँग्रेसची बाजी, भाजपच्या बालेकिल्ल्यात आघाडीचा धक्का
- आरती जेरथ यांचा कॉलम:‘आप’ नेत्यांच्या सुटकेनंतर काँग्रेस पक्ष चिंताक्रांत का?
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
इतर
- सरकार तुमचे बँक खाते गोठवू शकत नाही: आर्थिक संकटाच्या व्हायरल दाव्याची पडताळणी
- नाशिकमध्ये निवडणुकीतील पराभव जिव्हारी, राजकीय नेत्याचा युवकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला
- राज्यात उन्हाचा कडाका वाढला: उष्माघातापासून बचावासाठी आरोग्य विभागाकडून 'अॅडव्हायजरी' जारी; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
- Pune- पुणे महापालिकेचा मोठा निर्णय! २३ गावांच्या विकासासाठी ९५४ कोटींचा ‘बूस्टर डोस’
मनोरंजन
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नांदेडच्या औद्योगिक शिरपेचात मानाचा तुरा! ४,२५० कोटींचा हेलिकॉप्टर प्रकल्प जाहीर; हजारो तरुणांना मिळणार रोजगार
- LPG टंचाई: सिलिंडर वाहनांना पोलीस सुरक्षा द्या आणि तात्काळ 'कंट्रोल रुम' उभारा; राज्य सरकारचे जिल्हाधिकाऱ्यांना कडक निर्देश
- गॅस टंचाई हाताळण्यासाठी केंद्र सरकार सरसावले: हॉटेल्सना पर्यायी इंधन, राज्यांना अतिरिक्त रॉकेल
- मुंबईत खलिस्तानी संघटनेच्या नावाने बॉम्बस्फोटाची धमकी; तपासानंतर अफवा असल्याचे स्पष्ट.
























Subscribe to my channel



Become our partner and turn referrals into revenue—join now!