
पुणे - वनाज-रामवाडी मार्गावरील मेट्रोच्या चारही स्थानकांच्या संरचनेच्या कामांतील त्रुटी प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून तातडीने दूर कराव्यात, अशी मागणी तज्ज्ञांच्या एका गटाने महामेट्रोकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. केंद्रीय मेट्रो रेल्वेचे सुरक्षा आयुक्त (सीएमआरएस) जनक गर्ग यांच्याकडेही या तज्ज्ञांनी महामेट्रोच्या कामाबाबत छायाचित्रांसह आक्षेप नोंदविले आहेत. दरम्यान, स्थानकांची संरचना सुरक्षित असल्याचा दावा महामेट्रोने केला आहे.
शहरातील वनाज-रामवाडी मार्गावरील मेट्रोचे गेल्या वर्षी ६ मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या मार्गावर गरवारे महाविद्यालय, नळस्टॉप, आनंदनगर, वनाज ही स्थानके आहेत. त्यावर सध्या प्रवासी वाहतूक सुरू आहे. हैदराबाद मेट्रोचे माजी व्यवस्थापकीय संचालक विवेक गाडगीळ, कोकण रेल्वेचे माजी व्यवस्थापकीय संचालक डॉ. केतन गोखले, स्थापत्य अभियंता आणि प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार शिरीष खासबारदार आणि स्ट्रक्चरल अभियंते नारायण कोचक यांच्या गटाने गरवारे महाविद्यालय ते वनाज दरम्यानच्या मेट्रो मार्गाची आणि स्थानकांची पाहणी केली. त्याच्या आधारे त्यांनी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, संचालक अतुल गाडगीळ आणि ‘सीएमआरएस’कडे निवेदन पाठविले आहे.
दरम्यान, ‘सीएमआरएस’ने ‘या त्रुटींबाबत आम्हाला कल्पना आहे, आम्ही योग्य ती दखल घेऊ’, असा ई-मेलद्वारे प्रतिसाद दिल्याचे गाडगीळ यांनी नमूद केले.
मेट्रो कामाच्या दर्जा आणि गुणवत्तेबाबत दुर्लक्ष करून चालणार नाही. इतका मोठा प्रकल्प राबविताना प्रवाशांची सुरक्षितता महत्त्वाची असून तिच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आम्ही फक्त चार स्थानकांची पाहणी केली आहे. अन्य स्थानके खुली झालेली नसल्यामुळे तेथे काय सुरू आहे, याबाबत कल्पना नाही. मात्र प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी चारही स्थानकांचे तज्ज्ञांकडून स्ट्रक्चरल ऑडिट करणे गरजेचे आहे.
- विवेक गाडगीळ, माजी व्यवस्थापकीय संचालक, हैदराबाद मेट्रो
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!


























Subscribe to my channel

