
Pimpri-Chinchwad : पिंपरी- चिंचवड शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पिंपरी प्रभाग क्रमांक २१ मध्ये भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या घरात शिरून धिंगाणा घातल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या घटनेत घरातील सदस्यांना शिवीगाळ, मारहाण तसेच ३३ वर्षीय डॉक्टर महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला असून, याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही घटना रात्री सव्वा बारा वाजताच्या सुमारास घडली.
याप्रकरणी स्वप्नील वाघेरे, सूरज वाघेरे, सागर वाघेरे, सिद्धार्थ वाघेरे, वरुण जगताप, प्रशांत वाघेरे, सारंग वाघेरे यांच्यासह अन्य काही जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभाग क्रमांक २१ मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या घरात भाजपचे कार्यकर्ते घुसले. तक्रारदार महिलेची जाऊ या प्रभागातून निवडणूक लढवत असून, प्रचार आटोपून तक्रारदार महिला रात्री सुमारे दहा वाजता घरी परतल्या होत्या. आरोपी हे विरोधी पॅनलमधील भाजप उमेदवार उषा संजोग वाघेरे यांचे समर्थक व कार्यकर्ते असल्याचे पोलीस तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
|
Pune : लोणावळा–खंडाळा घाट टाळून थेट पुण्याला पोहोचणार; 14 किमीचा नवा मार्ग, अर्धा तास वाचणार |
तक्रारीनुसार, रात्री १२.१५ च्या सुमारास पिंपरी गावात आरोपी जमले. स्वप्नील वाघेरे याने परवानगीशिवाय घरात प्रवेश करत तक्रारदार महिलेच्या चुलत सासऱ्यांना अश्लील शिवीगाळ केली. “आमच्या विरोधात उमेदवार उभा करण्याचं धाडस केलंस, जीवे मारून टाकू,” अशी धमकी देण्यात आली. आरोपींनी तक्रारदार डॉक्टर महिलेला शिवीगाळ करत अश्लील वर्तन केले आणि तिचा विनयभंग केला. तसेच दिराला धक्काबुक्की, आजीसासूंना ढकलणे, दुचाकी वाहनांचे नुकसान करत परिसरात दहशत निर्माण केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या गंभीर घटनेनंतर राजकीय वातावरण अधिकच तणावपूर्ण बनले असून, प्रकरणाचा तपास पिंपरी पोलीस करत आहेत.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले




























Subscribe to my channel


1 thought on “Pune Election : भाजप कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी उमेदवाराच्या घरी गोंधळ; डॉक्टर महिलेचा विनयभंग, मध्यरात्री तणाव”