Pune Crime : पतीला मारहाण करत पत्नीसोबत संतापजनक कृत्य; पुणे रेल्वे स्टेशनजवळील भुयारी मार्गात घडलं भयंकर

Pune Crime : विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुण्यात एका अनोळखी तरुणाने महिलेचा विनयभंग करत तिच्या पतीला बेदम मारहाण केली आहे. ही संतापजनक घटना पुणे रेल्वे स्टेशनजवळील भुयारी मार्गात रविवारी (९ जुलै) पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली.

याप्रकरणी २३ वर्षीय पीडित महिला आणि तिच्या पतीने दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी अनोळखी तरुणाविरोधात गुन्हा  दाखल केला असून त्याचा शोध सुरू केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला रविवारी पहाटे पतीसमवेत महाराष्ट्र एक्स्प्रेसने पुण्यात रेल्वे स्टेशनवर उतरली.

Mumbai Crime : MPSC च्या क्लासमध्ये तरुणीचा विनयभंग; संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

तेथून हे दांपत्य रेल्वे स्टेशनलगतच्या भुयारी मार्गातून पायी निघाले होते. भुयारी मार्गाच्या पायऱ्यांवरून उतरताना महिलेच्या पतीचा पाय घसरला. त्यावेळी पाठीमागून आलेल्या अनोळखी तरुणाने महिलेचा विनयभंग केला. याबाबत महिलेच्या पतीने जाब विचारल्यानंतर अनोळखी तरुणाने महिलेच्या पतीला शिवीगाळ करून मारहाण केली.

या घटनेनंतर तो तरुण पसार झाला. घटनेनंतर महिलेसह तिच्या पतीने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी  अज्ञात तरुणाविरोधात गु्न्हा दाखल केला असून त्याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, बाहेरगावाहून आलेले अनेक प्रवासी, नागरिक या भुयारी मार्गाचा वापर करतात. महिलेच्या विनयभंगाच्या घटनेवरून भुयारी मार्गामध्ये रात्रीच्या वेळी पोलिसांची सुरक्षा वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply