Pune Crime : क्लासमेटचा त्रास, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थीनीने १५ व्या मजल्यावरून उडी मारली, पिंपरी हादरले

Pune : क्लासमेटच्या त्रासाला कंटाळून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थीनीने १५ व्या मजल्यावरून उडी घेत आयुष्य संपवले. पिंपरी चिंचवडमधील ताथवडेमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी वाडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सहिती कलुगोटाला रेड्डी असे आत्महत्या कऱणाऱ्या विद्यार्थीनीचे नाव आहे. आकुर्डीतील डी वाय पाटील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तिसऱ्या वर्षात शिकत होती.

वर्ग मित्राकडून वारंवार मानसिक आणि शारीरिक त्रास होत होता, कॉलेजमध्ये आणि बाहेरही तो वारंवार त्रास देत होता. त्रासाला कंटाळूनच सहिती हिने टोकाचे पाऊल उचलल्याचे तपासात स्पष्ट झालेय. सहिती हिने मोबाईलचा पासवर्ड लिहून ठेवला अन् त्यानंतर १५ व्या मजल्यावरून उडी घेतली. मोबाईल मिळाल्यानंतर सहितीच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत या प्रकरणी वर्गमित्र प्रणव राजेंद्र डोंगरे याला बेड्या ठोकल्या,

Sangli : यात्रेवरून परतताना सांगलीत मध्यरात्री तरुणांची हुल्लडबाजी; पोलिसांकडून चोप

२० वर्षीय सहिती कलुगोटाला रेड्डी ही आकुर्डी येथील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये तिसऱ्या वर्षात शिकत होती. सहिती हिने आयुष्य संपवले, त्यानंतर वडील कलुगोटाला वेंकटा सीवा रेड्डी यांनी वाकड पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहिती आयुष्य संपवल्यानंतर नेमकं कारण समजले नव्हते. त्यामुळे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. सहिती हिच्या मोबाइलमध्ये पोलिसांना अनेक रेकॉर्डिंग मिळाल्या, त्याशिवाय एक मेसेजही मिलाला. त्यामध्ये तिने आपल्याला होत असलेल्या त्रासाबद्दल माहिती लिहिली होती. जवळच्या काही मित्रांनाही तिने आपल्यासोबत घडत असलेल्या प्रकाराबद्दल सांगितले होते. मित्राला मोबाईल अन् पासवर्ड कुठे ठेवला, याबाबत तिने सांगितले होते. मित्रांनी याबाबत पोलिसांना सांगितले, त्यानंतर तपासाला वेग आला. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply