Pune Crime News : बुधवार पेठेतून चार बांगलादेशी महिला ताब्यात

Pune Crime : बुधवार पेठेतील वेश्या वस्तीत बेकायदा वास्तव्य केल्याप्रकरणी चार बांगलादेशी महिलांना गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने ताब्यात घेतले. तर, अन्य पाच महिलांविरुद्ध सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव केल्याप्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

मासुका कलाम फकीर ऊर्फ शेख (वय २५), पिया नाझ्मुल सरदार ऊर्फ शेख (वय २७), रुजी हारून शेख (वय ३८), रूपा आकाश मंडोल (वय ४०, सध्या रा. बुधवार पेठ, मूळ, रा. बांगलादेश) अशी कारवाई केलेल्या महिलांची नावे आहेत. त्यांच्याकडे भारतातील वास्तव्याची अधिकृत कागदपत्रे चौकशीत आढळून आली नाहीत.

Nagpur Accident : नागपूरमध्ये भरधाव कारची ट्रॅक्टरला धडक, दोघांचा मृत्यू तर ५ गंभीर जखमी

या चारजणी बुधवार पेठेतील कुंटणखान्यात मागील बारा वर्षांपासून राहत होत्या. याबाबत गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागातील पोलिस कर्मचारी तुषार भिवरकर यांना मिळाली होती. त्यानुसार सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने कुंटणखान्यात छापा टाकून नऊ महिलांना ताब्यात घेतले. बांगलादेशी महिलांविरुद्ध फरासखाना पोलिस ठाण्यात पारपत्र अधिनियम आणि परकीय नागरिक आदेश कायद्यातील कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे आणि पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव, सहाय्यक निरीक्षक राजेश माळेगावे, अनिकेत पोटे, सागर केकाण, अमेय रसाळ, इम्रान नदाफ, बाबा कर्पे, संदीप कोळगे, राजेंद्र कुमावत, मनिषा पुकाळे, रेश्मा कंक यांनी ही कारवाई केली.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *