
Maharashtra Politics : आज राजकीय वर्तुळात चर्चा होती ती, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीची. नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज ठाकरेंची भेट घेतली. शिवाजी पार्क येथील शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन फडणवीसांनी राज ठाकरेंची भेट घेतली. तब्बल तासभर दोघांमध्ये चर्चा झाली. दरम्यान, राज ठाकरे यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी शिवतीर्थवर ही भेट घेतल्यचं भाजपकडून सांगण्यात आलं आहे. मात्र या दोघांच्या भेटीत आगामी पालिका निवडणुकीबाबत खलबतं झाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राज ठाकरेंनी पत्र लिहून कौतुक केलं होतं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच राज ठाकरेंची भेट घेणार असल्याचं जाहीर केलं होतं. आज देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंची भेट घेतली. दरम्यान राज ठाकरे यांची शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांची विचारपूस करण्याच्या उद्देशाने ही भेट नियोजित आहे. राज्यातील सत्तासंघर्षाच्या काळात राज ठाकरेंवर शस्त्रक्रिया पार पडली. या काळात त्यांची भेट घेणं शक्य न झाल्यामुळे फडणवीस त्यांच्या भेटीसाठी गेल्याचं म्हटलं जातं आहे.
शिवसेनेतील प्रबळ नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर भाजपसोबत एकत्र येत राज्यात सत्ता स्थापन केली. भाजप सत्तेत आली मात्र मुख्यमंत्री पदाची धुरा एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आली. तर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. फडणवीस पुन्हा सत्तेत आल्यानंतर राज ठाकरे यांच्याकडून पत्र लिहून फडणवीस यांचं कौतुक करण्यात आलं होतं. त्यामुळे शिवसेनेतील बंडानंतर झालेल्या या भेटीला राजकीय महत्त्व प्राप्त झालं आहे. राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मशिदीवरील भोंग्यांविरोधात भूमिका घेतली होती. त्यावेळी राज ठाकरेंच्या भूमिकेचं भाजपकडून स्वागत करण्यात आलं होतं. राज ठाकरेंच्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे भाजप आणि मनसे यांच्यातील युतीच्या चर्चाही राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. त्यामुळे आजची भेट ही सदिच्छा भेट होती की, राजकीय रणनीती आखणारी होती, हे येणारा काळच सांगेल.
शिवसेना भाजपपासून दुरावल्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये मैत्री
शहर
- पुणे: आजी-आजोबांच्या डोळ्यांतील प्रकाश जपण्यासाठी पुण्यात अनोखा उपक्रम; मोतीबिंदू शस्त्रक्रिया फक्त ₹६,९९९ मध्ये
- पुणे: रोबोटिक गुडघा शस्त्रक्रिया: वेदनामुक्त हालचालींसाठी पुण्याच्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये नवी आशा
- मान्सूनचा 'विलंब'! 'एल निनो'च्या प्रभावामुळे महाराष्ट्रात पावसाची कमतरता; जुलै महिन्यानंतरच पावसाचा जोर वाढणार, हवामान विभागाचा अंदाज.
- हैदराबाद हादरले! आंबे खाल्ल्यानंतर दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू; 'फूड पॉयझनिंग'चा संशय, पोलिसांकडून सखोल तपास सुरू.
महाराष्ट्र
- पुणे: आजी-आजोबांच्या डोळ्यांतील प्रकाश जपण्यासाठी पुण्यात अनोखा उपक्रम; मोतीबिंदू शस्त्रक्रिया फक्त ₹६,९९९ मध्ये
- पुणे: रोबोटिक गुडघा शस्त्रक्रिया: वेदनामुक्त हालचालींसाठी पुण्याच्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये नवी आशा
- मान्सूनचा 'विलंब'! 'एल निनो'च्या प्रभावामुळे महाराष्ट्रात पावसाची कमतरता; जुलै महिन्यानंतरच पावसाचा जोर वाढणार, हवामान विभागाचा अंदाज.
- हैदराबाद हादरले! आंबे खाल्ल्यानंतर दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू; 'फूड पॉयझनिंग'चा संशय, पोलिसांकडून सखोल तपास सुरू.
गुन्हा
- मुंबई: पोलीस दाम्पत्याचा वाद पोहोचला पोलीस ठाण्यात; मानसिक छळ करणाऱ्या पतीविरुद्ध अखेर गुन्हा दाखल!
- बार्शी हादरले! शेअर मार्केटच्या नादात उद्ध्वस्त झाला संसार; १.८० कोटींच्या कर्जापायी मुख्याध्यापकाने पत्नी आणि दोन मुलांचा जीव घेतला; त्यानंतर स्वतःही संपवले आयुष्य.
- पुण्यात 'फेक' कॉल सेंटरचा पर्दाफाश! ऑनलाइन गेमिंगच्या नावाखाली दररोज शेकडो लोकांची लाखो रुपयांची लूट; टोळी गजाआड.
- मुलुंड: फ्लॅट खरेदीदारांची दीड कोटींची फसवणूक; बिल्डरविरोधात गुन्हा दाखल, पुनर्विकास प्रकल्पात मोठा गंडा!
राजकीय
- स्मृती इराणींचे नाव मतदार यादीतून गायब! अमेठीत स्थानिक पंचायत निवडणुकीच्या यादीत नाव नसल्याने राजकीय वर्तुळात खळबळ.
- तृणमूल काँग्रेसच्या नेता रबीउल इस्लामची 'काळी' कृत्ये उघड; महिलांना त्रास देऊन बदनामी करण्याचे षड्यंत्र!
- राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसचे विलीनीकरण होणार? नाना पटोलेंच्या दिल्ली दौऱ्याने राजकीय वर्तुळात खळबळ; मोठ्या निर्णयाचे संकेत!
- मध्य प्रदेश राज्यसभा निवडणूक: काँग्रेसचा उमेदवारी अर्ज बाद; भाजपच्या उमेदवाराचा बिनविरोध विजयाचा मार्ग मोकळा!
इतर
- आजचे राशिभविष्य १२ जून २०२६: 'या' राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; जाणून घ्या तुमचे नशीब!
- आर्थिक राशिभविष्य ११ जून २०२६: कमला एकादशीच्या दिवशी या राशींवर बरसणार धन, मिळेल यश!
- आर्थिक राशिभविष्य १० जून २०२६: आयुष्मान योगाचा प्रभाव! वृषभ, मिथुन आणि कर्क राशीसाठी प्रगतीचे योग!
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
मनोरंजन
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- सिंधुदुर्ग: प्रेमात डर्टी गेम! लग्नात अडसर ठरणाऱ्या प्रेयसीची प्रियकर शिक्षकाकडून निर्घृण हत्या
- NEET-UG २०२६ परीक्षेसाठी NTA चा महत्त्वाचा निर्णय; वेळ आणि प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यात दिलासा!
- तृणमूल काँग्रेसच्या नेता रबीउल इस्लामची 'काळी' कृत्ये उघड; महिलांना त्रास देऊन बदनामी करण्याचे षड्यंत्र!
- गोरखपूर: माणुसकीला काळीमा! आईच्या तेराव्याच्या खर्चावरून मोठ्या भावाने लहान भावावर झाडल्या गोळ्या; तरुणाचा मृत्यू.
























Subscribe to my channel


