Pune : फॉर्च्युनरमध्ये बिझनेसमनची हत्या; सूत्रधार पुण्याचा माजी नगरसेवक असल्याचा धक्कादायक आरोप, ताम्हिणी घाटात प्रकरणाला भीषण ट्विस्ट

Pune : चऱ्होलीतील वडमुखवाडी येथे व्यावसायिक नितीन गिलबिले यांचा गोळीबार करून खून करणाऱ्या टोळीतील तिघांना अटक केल्यानंतर हे प्रकरण धक्कादायक वळणावर येऊन ठेपले आहे. खुनाचा सूत्रधार म्हणून माजी नगरसेवक किसन महाराज तापकीर यांचे नाव समोर आले असून, दिघी पोलिसांनी त्यांचा आरोपींमध्ये समावेश केला आहे. तापकीर यांचा या गुन्ह्यातील सहभाग कोणत्या स्वरूपाचा, हे तपासात स्पष्ट व्हायचे असले, तरी त्यांचे नाव पुढे आल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

नितीन शंकर गिलबिले (वय ३७, रा. वडमुखवाडी) असे खून झालेल्या व्यवसायिकाचे नाव आहे. या प्रकरणी अमित जीवन पठारे (वय ३५, रा. पठारेमळा, चऱ्होली), विक्रांत सुरेश ठाकूर (रा. सोळू, ता. खेड) आणि सुमीत फुलचंद पटेल (वय ३१, रा. गायकवाडनगर, दिघी) या तिघांना अटक केली आहे.

Pune : HSRP नंबर प्लेटसाठी रविवारपर्यंतच अंतिम मुदत; १५ लाख वाहनधारकांवर ३० नोव्हेंबरनंतर कठोर कारवाई

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी, १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी अलंकापुरम रस्त्यावर गिलबिले आणि त्यांच्या ओळखीतील काही जण थांबलेले असताना अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर हे फॉर्च्युनर कारमधून तेथे आले. त्यांनी 

नितीन गिलबिले यांना कारमध्ये बसवून त्यांच्या डोक्यात जवळून गोळी झाडली. गिलबिले यांचा जागीच मृत्यू झाला. आरोपी त्यानंतर पसार झाले.

दरम्यान, आरोपी ताम्हिणी घाट परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी या भागात शोधमोहीम राबवताना विनाक्रमांकाची एक मोटार संशयित अवस्थेत दिसली. पोलिसांनी पाठलाग करून मोटार ताब्यात घेतली आणि विक्रांत ठाकूर व सुमीत पटेल यांना पकडले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटार व मोबाइल जप्त करण्यात आले. मुख्य आरोपी अमित पठारे याला दिघी पोलिसांनी वाघोली येथून अटक केली. सुमीत पटेल हा गोळीबाराच्या आधी व नंतरही आरोपींसोबत फिरत होता, त्यामुळे त्याचाही गुन्ह्यात समावेश करण्यात आला आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *