Pune Crime : पिस्तूल बाळगल्या प्रकरणी जुन्नर येथील तरुणाला अटक; 2 लाख तीस हजार रुपयांचा माल जप्त

नारायणगाव : कांदळी (ता. जुन्नर) येथील पुणे नाशिक महामार्गा लगत असलेल्या तुळजाभवानी सांस्कृतिक कला केंद्रासमोर गावठी पिस्तूल बाळगून फिरणाऱ्या जुन्नर येथील तरुणास नारायणगाव पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून गावठी बनावटीचे मॅक्झिन असलेले पिस्तूल, बुलेट मोटरसायकल असा दोन लाख तीस हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.

आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.या प्रकरणी सागर अरुण चौगुले (वय २८, रा. शुक्रवार पेठ, जुन्नर) याला अटक केली आहे. या बाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक ताटे म्हणाले कांदळी (ता. जुन्नर) येथील तुळजाभवानी सांस्कृतिक कला केंद्रा समोर एक तरुण गावठी पिस्तूल घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती.

त्या नुसार सापळा लावला असता खाकी रंग असलेल्या बुलेट मोटरसायकलवर एक तरुण संशयितरित्या फिरत असल्याचे आढळून आले. त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडे गावठी बनावटीचे मॅक्झिन असलेले पिस्तूल आढळून आले.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल शैलेश वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्याला अटक करण्यात आली. पुढिल तपास तपास पोलीस हवालदार पोपट मोहरे करत आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, पोलीस नाईक मंगेश लोखंडे, शैलेश वाघमारे यांच्या पथकाने ही कारवाई केली .



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply