Pune Crime : आईच्या ऑपरेशनसाठी फोडलं शेजाऱ्याचं घर; पळवले लाखो रुपयांचे दागिने

Pune Crime  : पैशांची चणचण असल्याने आईच्या ऑपरेशनसाठी लागणाऱ्या पैशांसाठी एका व्यक्तीने शेजाऱ्याचं घर फोडलं. घर फोडून लाखो रुपयांचे दागिने आणि रोकड पैसे लंपास केलेत. ही घटना बिबवेवाडीत घडली असून पोलिसांना याप्रकरणाचा छडा लावत चोराला बेड्या ठोकल्यात.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव दिपक नामदेव पाटोळे (वय ४१) असे आहे. आरोपी बिबवेवाडीतील बहुमजली सोसायटीत सहाव्या मजल्यावर राहत होता. दि. २८ ऑक्टोबर २०२३ ते २ ऑक्टोबर २०२३ या काळात त्याच्या शेजारी राहणारे एक कुटूंब त्यांच्या मुळगावी गेले होते. ही संधी साधत आरोपीने हॉलच्या बाल्कनीच्या दरवाजाचे कडी कोयंडा तोडून सोन्याचे दागिने व रोकड लंपास केली.

Pune Crime News : जमिनीचा वाद तरुणाच्या जीवावर बेतला, मित्रानेच केली मित्राची निर्घृण हत्या

या चोरीप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली. त्यानंतर बिबवेवाडी पोलिसांनी याचा तपास सुरू केला. या तपासात चोरी करणारा चोरटा त्या शेजारीच निघाल्याने पोलीस आवाक झालेत. आर्थिक चणचण आणि आईच्या ऑपरेशनसाठी पैसे हवे होते म्हणून दिपकने शेजाऱ्याचं घर फोडत रोकड लंपास केली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply