Pune : पुण्यात दिवसाढवळ्या तरुणावर हल्ला; दोघांकडून 16 वर्षीय मुलाची हत्या, आरोपी अटकेत

 

 

Pune : शहरातील खडक पोलीस ठाणे हद्दीत अल्पवयीन मुलाच्या निर्घृण हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी (11 एप्रिल 2026) घडलेल्या या प्रकारामुळे काशेवाडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संशयितांना ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अबूबकर अमजद खान (वय 16, रा. समर्थ परिसर, पुणे) हा शनिवारी काशेवाडी येथील त्रिकोणी गार्डन परिसरात होता. यावेळी काही अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. हल्लेखोरांनी त्याच्यावर अनेक वार करत त्याला गंभीर जखमी केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अबूबकरला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला. प्राथमिक तपासात हल्लेखोर विमाननगर परिसरातील म्हाडा कॉलनीत राहत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने शोधमोहीम राबवून काही तासांतच दोन संशयितांना ताब्यात घेतले.

ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे तुफेलअली अश्रफअली सय्यद (वय 19) आणि कमरअली सज्जदअली सय्यद (वय 19, दोघे रा. म्हाडा हाऊसिंग सोसायटी, विमाननगर, पुणे) अशी आहेत. चौकशीदरम्यान दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली असून, हल्ल्यासाठी वापरलेले धारदार शस्त्र पोलिसांनी जप्त केले आहे.

आरोपींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना पुढील कारवाईसाठी खडक पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

1 thought on “Pune : पुण्यात दिवसाढवळ्या तरुणावर हल्ला; दोघांकडून 16 वर्षीय मुलाची हत्या, आरोपी अटकेत

Leave a Reply to Miranda2454 Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *