Pune Crime : पुणे शहरातील तीन हुक्का पार्लरवर छापे, आठजणांवर गुन्हा दाखल

पुणे - शहरात गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक आणि सामाजिक सुरक्षा विभागाने कोरेगाव पार्क आणि स्टेशन रोड परिसरातील तीन हॉटेलवर छापे टाकले. या वेगवेगळ्या कारवाईत आठजणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अमली पदार्थ विरोधी पथकाने (एक) राजा बहादूर मिल स्टेशन रोड येथील हॉटेल ड्रामामधील अवैध हुक्का पार्लरवर छापा टाकला. त्यावेळी हॉटेलचा व्यवस्थापक आणि वेटर ग्राहकांना तंबाखूजन्य हुक्का पुरवीत होते. त्यांच्या ताब्यातून १८ हजार रुपये किमतीचे काचेचे हुक्का पॉट आणि तंबाखूजन्य हुक्का फ्लेवर जप्त करण्यात आले.

तसेच, कोरेगाव पार्कच्या लेन क्रमांक सातमधील हॉटेल मोकावर छापा टाकून ३४ हजार रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले. पोलिसांनी हॉटेलच्या मालकांसह आठजणांवर गुन्हे दाखल केले आहेत. तसेच, हुक्का पिणाऱ्या सातजणांविरुध्द खटले दाखल करण्यात आले आहेत.

कोरेगाव पार्कमधील हुक्का पार्लरवर छापा -

कोरेगाव पार्क परिसरातील गेरा लेजंट इमारतीमधील रॉक वॉटर या रूफ टॉप हॉटेलमध्ये पोलिसांनी छापा टाकून हुक्का पॉट आणि तंबाखूजन्य हुक्का फ्लेवर जप्त करण्यात आले. सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने सोमवारी (ता. २३) ही कारवाई केली. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *