Pune Byelection : चिंचवड पोटनिवडणुकीत नाना काटेंना राष्ट्रवादीकडून उमेदवारी, मविआने भाजपसाठी निवडणूक सोपी केल्याची चर्चा

Pune Byelection : चिंचवड पोटनिवडणुकीचा सस्पेन्स अखेर संपुष्टात आला आहे. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाना काटे यांना उमेदवार घोषित करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

जयंत पाटील यांनी ट्वीट करत म्हटलं की, चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्री. नाना काटे हे उमेदवार असतील. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी एकत्र काम करून या निवडणुकीत आम्ही नक्कीच विजयी होऊ, असा आम्हाला विश्वास आहे.

चिंचवड पोटनिवडणुकीसाठी राहुल कलाटे यांचं नाव चर्चेत असताना आता नाना काटे यांना उमेदवारी मिळाली आहे. राष्ट्रवादीसाठी ही जागा सुटली असताना राष्ट्रवादीतील कुणाला तरी उमेदवारी मिळावी असा आग्रह स्थानिक नेत्यांचा होता.

मात्र राहुल कलाटे हे नाना काटे यांच्यापेक्षा ताकदीचे उमेदवारी ठरले असते. कारण मागील विधानसभा निवडणुकीत राहुल कलाटे यांनी भाजपनंतर दुसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक मतं मिळवली होती.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply