
Pune : पुण्याच्या सहकार नगरमध्ये टोळक्यांनी वाहनांची तोडफोड केल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याच परिरात टोळीचा धिंगाणा सुरुच आहे. या टोळीला पोलिसांचा धाक राहिला नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सध्या सहकार नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये भरचौकात एका टोळीने भाईचा बर्थडे सेलिब्रेट केला आहे. या भाईने भरचौकात गाडी आडवी लावून नंतर त्यावर केक ठेवून तलवारीने केक कापला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,सहकार नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका रस्त्यावर या टोळीने बुधवारी रात्री उशिरा भाईचा बर्थडे सेलिब्रेट केला. गल्लीबोळामध्ये या अशाप्रकारे बर्थडे सेलिब्रेशनचे प्रमाण पुण्यामध्ये वाढत चालले आहे. या टोळीने भररस्त्यात गाडी आडवी लावली. त्यानंतर मोठी गर्दी करत नंतर गाडीवर केक ठेवून तलवारीने केक कापला.
त्यानंतर या टोळीने त्याठिकाणी धिंगाणा घालत आरडाओरडा केला. त्यामुळे नागरिकांना त्रास झाला. अशाप्रकारच्या टोळीकडून सतत होणारे राडे यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. आधीच वाहनांच्या तोडफोडीची घटना त्यानंतर अशाप्रकारे बर्थडे सेलिब्रेशन करुन धिंगाणा घातल्याने या टोळीला पोलिसांचा धाक राहिला आहे की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सहकार नगर पोलिसांनी या घटनेची दखल घेतली आहे. याप्रकरणी पोलिसांनी धिंगाणा घालणाऱ्या सर्व तरुणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम पोलिसांकडून सुरु आहे. अशाप्रकराची घटना यापूर्वी देखील पुण्यामध्ये घडली आहे. पुण्यातील उत्तमनगर परिसरात 18 जून रोजी टोळीने अशाचप्रकारे वाढदिवस साजरा करुन धिंगाणा घातला होता.
उत्तमनगर परिसरात वाढदिवसाला टोळीकडून कोयते फिरवत तसेच दगडफेक केल्याची घटना घडली होती. याठिकाणी भर रस्त्यात टोळीकडून वाढदिवस साजरा करण्यात आला होता. यावेळी किरकोळ कारणावरुन त्यांच्यात वाद झाला. या वादानंतर टोळीने एकमेकांना शिवीगाळ करत गाड्यांची तोडफोड केली होती. कार, दुचाकीसह इतर वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. यामुळे वाहनांचे मोठे नुकसान झाले होते. या घटनेमुळे उत्तमनगर परिसरातील नागरिकांमध्ये दहशत परसरली होती.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ? नितीश कुमार राज्यसभेवर, भाजपला मुख्यमंत्रीपदाची संधी.
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती





















Subscribe to my channel

