Pune Accidnet : पुण्यात चांदणी चौक परिसरात भीषण अपघात, शिवशाही बसची ६-७ वाहनांना जोरदार धडक

पुणे : पुण्याजवळ चांदणी चौक परिसरात भीषण अपघात झाला आहे. एका शिवशाही बसने चारचाकी गाड्यांचा धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात आठ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

पुण्यातील चांदणी चौक परिसरातील सुस खिंडीजवळ शिवशाही बसने सहा वाहनांना जोरदार धडक दिली. या जोरदार धडकेत गाड्यांचं मोठं नुकसान झालं आहे. शिवशाही बसचंही यामध्ये नुकसान झालं आहे.

अपघातानंतर काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. तसेच रस्तावर सर्वत्र ऑईल सांडल्याने वाहतूक काहीशी मंदावली आहे



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *