Pune Accident : ट्रक आणि कारचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, चिमुकल्यासह दोन जण जखमी

Pune Accident : पुण्यातील भोर तालुक्यातील ट्रक आणि कारच्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. तर दोन वर्षांच्या चिमुकल्यासह एकजण जखमी आहे. चीव्हेवाडीजवळील देवडी येथे हा भीषण अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, कार किकवीकडून कापूरहोळमार्गे सासवडकडे निघाली होती. तर ट्रक सासवडकडून कापूरहोळकडे निघाला होता. दोन्ही वाहनांची चीव्हेवाडीजवळील देवडी येथे जोरदार धडक झाली. चालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने थेट कारला धडक दिली, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.

धडक एवढी भीषण होती की, कार थेट ट्रकच्या खाली घुसली. धडकेनंतर कारच्या चालकासह एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर महिलेच्या दोन वर्षाच्या बाळासह अन्य एक व्यक्ती गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

मृतांची नावे

गणेश उर्फ बाळासाहेब शिवाजी लेकावळे (वय २८ वर्ष) आणि तृप्ती अक्षय जगताप (वय २६ वर्ष) अशी या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. तर मयत तृप्ती यांचा दोन वर्षाचा मुलगा कृष्णा अक्षय जगताप याच्यासह प्रकाश बाबुराव दरेकर हे जखमी आहेत. 

याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघात झाल्यानंतर ट्रकचा चालक फरार झाला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply