Pune Accident : कंटेनर-ट्रकचा भीषण अपघात; आगीत चौघांचा जळून मृत्यू , नवले ब्रिज परिसरातील घटना

पुणे/धायरी : मुंबई-बंगळूर महामार्गावर कंटेनरने ट्रकला पाठीमागून धडक दिल्यामुळे ट्रकला लागलेल्या भीषण आगीत चौघांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन पुरूष आणि एका महिलेसह मुलाचा समावेश आहे. तर, अन्य दोघे जण जखमी झाले आहेत. ही घटना नऱ्हे येथील स्वामी नारायण मंदिरासमोर सोमवारी (ता. १६) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.

मृतांमध्ये ट्रकचालक गोविंद तुकाराम जाधव (वय ३२) आणि क्लीनर सोमनाथ कल्लाप्पा नीळे (वय ४५, रा. वळसंग, ता. जत, जि. सांगली) यांचा समावेश आहे. पोलिस उपायुक्त सुहेल शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री मका भरडा पोती घेऊन मालवाहू ट्रक विटा-सांगली येथून गुजरातकडे निघाला होता.

Ahmednagar Train : मोठी दुर्घटना! अहमदनगर- आष्टी रेल्वेला भीषण आग; परिसरात धुराचे लोट

नवले पुलाजवळ स्वामी नारायण मंदिर परिसरात कंटेनरने ट्रकला पाठीमागून धडक दिली. त्यामुळे ट्रकला लागलेल्या आगीत ट्रकच्या केबिनमधील चारजणांचा होरपळून मृत्यू झाला. ट्रकमधील सहा जणांपैकी दोन जण बचावले. त्यांना उपचारासाठी काशीबाई नवले रुग्णालयात दाखल केले आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशामक दलाच्या सिंहगड रस्ता केंद्रातील जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी क्रेन मागविली. ट्रकच्या केबिनमध्ये अडकलेल्या चौघांना बाहेर काढण्यात आले. मात्र, त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली.

दरम्यान, महामार्गावर अपघातामुळे एकेरी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. त्यामुळे सेवा रस्त्यावरून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. अवजड वाहनांच्या रांगा लांबवर लागल्या आहेत. पुणे पोलिस, पीएमआरडीए, अग्निशमन सेवा आणि इतर यंत्रणांसह महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. सध्या पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. जखमी प्रवाशांच्या जबाबाच्या आधारे पोलिस तपास करण्यात येत आहे.

या घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अभय महाजन आणि सिंहगड वाहतूक विभाग, भारती विद्यापीठ वाहतूक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक पांडुरंग मोरे, प्रशांत कणसे आणि पोलिस कर्मचारी, राष्ट्रीय महामार्ग गस्त पथकाने घटनास्थळी धाव घेतली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply