Adhalrao Patil : आढळराव आज राष्ट्रवादीत ; उपमुख्यमंत्री अजित पवार, वळसे पाटील यांच्यासह अनेकांची उपस्थिती

मंचर : शिवसेनेचे उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे सर्व प्रमुख कार्यकर्त्यांसह मंचर (ता. आंबेगाव) येथे शिवगिरी मंगल कार्यालयात मंगळवारी  दुपारी साडेतीन वाजता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार दिलीप मोहिते पाटील, आमदार अतुल बेनके, आमदार चेतन तुपे आदी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विष्णू हिंगे यांनी दिली.

एकलहरे येथील पत्रकार परिषदेत ते म्हणाले, ‘‘शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून आढळराव यांची उमेदवारी निश्चित आहे. उमेदवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, दिलीप वळसे पाटील यांनी ग्रीन सिग्नल दिला आहे. आढळराव हे खासदार नसतानाही गेली पाच वर्षे सतत जनतेत आहेत. त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. पंधरा वर्षे खासदारकीचा त्यांना अनुभव आहे.

Kolhapur Fire News : केर्लीत गोडाऊनला भीषण आग, 20 लाखांचे नुकसान

 

त्यांनाही अनेकदा संसद रत्न पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या व वळसे पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक गावात विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी आलेला आहे. त्यांच्या समवेत सर्व कार्यकर्ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहे. तसेच, भाजपचे कार्यकर्तेही सोबत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान होणार आहेत. त्यांच्या विचाराचा उमेदवार खासदार म्हणून निवडून येण्यासाठी राष्ट्रवादी, भाजप व सर्व मित्र पक्ष एकजुटीने प्रचार यंत्रणा उभी करणार आहेत. आंबेगाव तालुक्यातून किमान एक लाखाचे मताधिक्य आढळराव यांना मिळेल, असा विश्वास आहे.’’अरुण गिरे व रवींद्र करंजखेले यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार हल्ला केला. ते म्हणाले, ‘‘खासदार म्हणून निवडून आल्यानंतर लोकांना मदत करणे तर सोडाच, पण अनेक गावांचे तोंडही डॉ. कोल्हे यांनी पाहिले नाही. त्यांचा खासदार निधी खर्च न झाल्याने मागे गेला आहे. निमंत्रण देऊनही अनेक कार्यक्रमाला त्यांनी दांडी मारली आहे. मी शूटिंगमध्ये व्यस्त आहे, असा ते निरोप देत होते. येथील जनतेने त्यांना शूटिंगच्या कामासाठी पाठवले नव्हते. याचे भान त्यांनी ठेवले पाहिजे. आढळराव पाटील पाच वर्षे सतत मतदारसंघ, राज्य व केंद्र सरकार बरोेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेबर संपर्कात आहेत. त्यांनी अनेक कामे मार्गी लावली आहेत. त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी कार्यकर्ते जिवाचे रान करतील.’’



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply