Pune ISIS Case: पुणे ISIS मॉड्यूल प्रकरणात २ दहशतवाद्यांना अटक; NIA ची मोठी कारवाई

Pune : पुणे आयएसआयएस मॉड्यूल प्रकरणात मोठी कारवाई करत राष्ट्रीय तपास यंत्रणेने दोन फरार दहशतवाद्यांना अटक केली आहे. अब्दुल्ला फैयाज शेख आणि तलहा लियाकत खान अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. हे दोघेही इंडोनेशियात लपून बसले होते. त्यांचा शोध घेत एनआयएने त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. दहशतवाद्यांना सध्या मुंबईत आणण्यात आले असून, लवकरच न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

एनआयएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघेही पुणे आयएसआयएस मॉड्यूल प्रकरणाशी संबंधित आहेत. त्यांनी या मॉड्यूलअंतर्गत IED तयार करण्याच्या कार्यशाळा, जंगलात फायरींग प्रॅक्टिस, लपण्यासाठी ठिकाणं शोधणे, तसेच सशस्त्र दरोडे आणि चोरीद्वारे निधी उभारणे अशा गंभीर कारवायांमध्ये सहभाग घेतला होता.

अब्दुल्ला फैयाज शेख हा पुण्याच्या कोंढवा परिसरातील मितानगरचा रहिवासी असून, तलहा लियाकत खान वानवडी परिसरात राहत होता. हे दोघेही गेल्या काही काळापासून फरार होते. त्यांच्या अटकेसाठी एनआयएने प्रत्येकी ३ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

Accident News : भरधाव टेम्पोची दुचाकीला धडक, बहीण-भावाचा जागीच मृत्यू

अटक केल्यानंतर दोघांना थेट मुंबईत आणण्यात आले आहे. दहशतवाद्यांना लवकरच न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

१० दहशतवादी संशयितांना अटक

अब्दुल्ला फैयाज शेख आण तल्हा खान यांच्या व्यतिरिक्त मोहम्मद इम्रान खान, मोहम्मद युनूस साकी, अब्दुल कादिर पठाण, सिमाब नसिरुद्दीन काझी, झुल्फिकार अली बडोदावाला, शमिल नाचन, अकीफ नाचन, शाहनवाज आलम या संशियत दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे.

आरोपींशी संबंधित मालमत्ता जप्त

एनआयएने यापूर्वी आरोपींशी संबंधित कोंढवा येथील मालमत्ता जप्त केल्या होत्या. या निवासी फ्लॅट्स आणि घरांचा वापर आयईडी बनवण्याचे प्रशिक्षण देणे, दहशतवादी कारवायांचे नियोजन करणे, आणि कट रचणे यासाठी केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी एनआयए अधिक तपास करत असून, इतर आरोपींचाही शोध सुरू आहे.

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply