Pune : पक्षकारांना जुने दस्त मिळण्याची सुविधा, सह जिल्हा निबंधक कार्यालयाचा पुढाकार, ७५ हजार दस्तांची यादी

Pune : दुय्यम निबंधक कार्यालयातील सन १९८५ ते २००१ या कालावधीतील ७५ हजार मूळ दस्त संबंधित पक्षकारांना परत दिले जाणार आहेत. त्यासाठी सह जिल्हा निबंधक कार्यालयाने पुढाकार घेतला असून, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत या मोहिमेला शुक्रवारी प्रारंभ करण्यात आला.

शहरातील दुय्यम निबंधक हवेली क्रमांक एक ते नऊ या कार्यालयात सन १९८५ ते २००१ या कालावधीतील साधारण दीड लाख मूळ दस्तऐवज नोंदणी पूर्ण होऊन आणि अन्य सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन तयार आहेत. मात्र, संबंधित पक्षकारांनी ते त्या वेळी घेतले नाही आणि पक्षकार जेव्हा ते घेण्यासाठी येतात त्यावेळी त्यांना ते परत मिळत नाहीत. अशामुळे कार्यालयातील महत्त्वाची कामे खोळंबून राहत असल्याचे पुढे आले होते. तसेच, जुने दस्त सांभाळणेही जोखमीची बाब असल्याने आणि त्यासाठी मनुष्यबळ आणि जागा खर्ची पडत असल्याने सह जिल्हा निबंधक पुणे शहर कार्यालयाने पुढाकार घेऊन दस्त पुन्हा परत करण्यासाठीची मोहीम हाती घेण्याचे निश्चित केले होते. राज्य शासनाच्या शंभर दिवसांच्या कृती आराखड्यात या उपक्रमाचा समावेश करण्यात आला होता.

त्यानुसार दुय्यम निबंधक हवेली क्रमांक एक ते नऊ कार्यालयांतील सर्व जुन्या दस्तांची पडताळणी करण्यात आली. त्यापैकी जे दस्त परत देणे शक्य आहे, त्यांच्या याद्या तयार करण्यात आल्या होत्या. त्यातील पहिल्या टप्प्यातील ७५ हजार याद्यांचे काम पूर्ण झाले असून, ते दस्त संबंधितांना परत केले जाणार आहेत, अशी माहिती सह जिल्हा निबंधक संतोष हिंगाणे यांनी दिली.

Pune : पिंपरीत स्कार्पिओ मधून महिलेचं अपहरण; घटना सीसीटीव्हीत कैद

याद्या नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाच्या संकेतस्थळावरही ‘नवीन’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. शहरातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयांचे अद्ययावत पत्ते आणि गुगल लोकेशन क्यू आर कोड ही या निमित्ताने संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. यादीमध्ये नमूद दस्तातील पक्षकारांनी संबंधित कार्यालयात जाऊन मूळ पावती आणि ओळखपत्र दाखवून त्यांचे मूळ दस्त परत घ्यावे, असे आवाहनही हिंगाणे यांनी केले आहे.

मूळ दस्तांची आवश्यकता कशासाठी ?

सन १९८५ ते २००१ या कालावधी काही दस्तांवर शेरे मारणे, संबंधित दुय्यम निबंधकांची स्वाक्षरी करणे, प्रतिलिपी करणे ही कामे वेळेत पूर्ण झाली नव्हती. मूळ दस्त नोंदणीनंतर तो मिळणे हा पक्षकाराचा कायदेशीर हक्क आहे. पक्षकारांना बँकेकडून कर्ज घेताना तारण म्हणून ठेवणे, मिळकतीची पुनर्विक्री करणे अशा विविध कारणांसाठी मूळ दस्त आवश्यक असतात. सहकारी गृहरचना संस्थांची मानीव खरेदीखताची प्रकरणे मार्गी लावण्यासाठीही संबंधित जुन्या मूळ करारनाम्याची आवश्यकता असते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply