Pune : इथेनॉलमुळे कारखान्यांच्या महसुलात प्रतिटन ३०० रुपये वाढ शक्य, माजी मंत्री राजेश टोपे यांचे प्रतिपादन

Pune : इथेनॉल उत्पादनाच्या प्रगत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने साखर कारखाने त्यांच्याकडे असलेल्या यंत्रसामग्रीचा योग्य वापर करून आणि धान्य आधारित तंत्रज्ञान स्वीकारून वर्षभर सुरू राहू शकतात. यातून साखर कारखान्यांचा महसूल प्रतिटन गाळप ३०० ते ४०० रुपये वाढू शकतो, असे प्रतिपादन माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले.

प्राज इंडस्ट्रीजच्या वतीने आयोजित तांत्रिक कार्यशाळेत टोपे बोलत होते. इथेनॉल प्रकल्पांमध्ये धान्य-आधारित ॲड-ऑन मॉड्यूल्सद्वारे इथेनॉल उत्पादन विस्तारासोबतच देशातील इथेनॉल मिश्रणाच्या वाढत्या संधींवर आणि जैवइंधन क्षेत्रातील नवकल्पनांवर या कार्यशाळेत चर्चा करण्यात आली. प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी, प्राजच्या बायोएनर्जी विभागाचे अध्यक्ष अतुल मुळे आणि इथेनॉल उद्योगाशी संबंधित तज्ज्ञ, संस्था आणि विविध भागधारक यावेळी उपस्थित होते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply