Pune : एकदा निवडून आलेला आमदार परत निवडून येत नाही, असा इतिहास असलेल्या मतदारसंघात यंदा इतिहास बदलण्यासाठी सहयोगी पक्ष आणि नेत्यांची ‘मैत्री’पूर्ण साथ आवश्यक ठरणार आहे. विद्यमान आणि माजी आमदारात सामना असल्याने अटतटीच्या बनलेल्या या लढतीत अन्य एक माजी आमदार काय भूमिका बजावतात, यावर अनेक समीकरणे अवलंबून आहेत.
कल्याणीनगर येथे मे महिन्यात झालेल्या ‘पोर्श कार’ अपघात प्रकरणामुळे चर्चेत आलेले राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे आमदार सुनील टिंगरे यांच्यावर विश्वास दाखवून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना वडगाव शेरीमधून उमेदवारी दिली आहे. तर, भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात प्रवेश केलेले माजी आमदार बापू पठारे यांना आमदार टिंगरे यांच्याविरोधात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उमेदवारी दिली आहे. त्यामुळे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात होणारी लढत माजी विरुद्ध विद्यमान आमदार अशी होणार आहे.
या लढतीत माजी आमदार आणि यंदाही इच्छुक असलेले भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांचीही भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. महायुतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला सोडण्यात आला. त्यामुळे उमेदवारी भरण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत इच्छुक असलेले मुळीक संधी न मिळाल्याने नाराज झाले. अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करून मुळीक यांची नाराजी दूर केली. विधान परिषदेसाठी संधी देण्याचा शब्द त्यांनी दिल्याने महायुतीचे उमेदवार टिंगरे यांच्या प्रचारात मुळीक सक्रिय झाले. गेल्या आठवड्यापासून मुळीक प्रत्येक ठिकाणी आमदार टिंगरे यांच्याबरोबर फिरताना दिसत आहेत. मात्र, त्यांचे काही पदाधिकारी अद्यापही नाराज असल्याने त्यांना सक्रिय करण्याचे आव्हान महायुतीपुढे आहे
|

वडगाव शेरी मतदारसंघ पुणे शहराच्या ईशान्य भागात येतो. येरवडा, विश्रांतवाडी, लोहगाव, खराडी असा आयटी कंपन्यांचा परिसर या मतदारसंघात आहे. मजूर, व्यापारी, आयटी कर्मचारी, इतर नोकरदार असा मोठा वर्ग येथे आहे. येरवडा भागात झोपडपट्टीचा भाग मोठा असून, निवडणुकीत हा वर्ग महत्त्वाची भूमिका बजावतो. स्थानिक मतदारांव्यतिरिक्त शेजारी असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील, तसेच राज्यातील विविध भागांतील नागरिक नोकरीनिमित्त या मतदारसंघात स्थायिक झाले आहेत. पोर्श अपघातानंतर या भागातील उच्च मध्यमवर्गीयांचा रोष स्थानिक आमदाराला सहन करावा लागला आहे. विरोधक हाच मुद्दा गेल्या काही दिवसांपासून निवडणुकीच्या प्रचारात पुन्हा आणत आहेत. हा मुद्दा ‘टर्निंग पॉइंट’ ठरणार का, हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
शहर
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
महाराष्ट्र
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना

Subscribe to my channel