Pune : मिरवणुकीत तरुणांच्या मृत्यू प्रकरणी मंडळाच्या अध्यक्षासह चौघांवर गुन्हा, वडगाव शेरीतील दुर्घटना

Pune  : पैगंबर जयंतीनिमित्ताने काढलेल्या मिरवणुकीत झेंडा फडकावणाऱ्या दोन तरुणांचा उच्च दाबाच्या वीज वाहिनीच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना वडगाव शेरीतील भाजी मंडई परिसरात घडली. दुर्घटनेस जबाबदार असल्याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी मंडळाच्या अध्यक्षांसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

याप्रकरणी वडगाव शेरीतील मिम बाॅईज फ्रेंड सर्कलचे अध्यक्ष हुसेन कादर शेख (वय ३५, रा. वडगाव शेरी), विकास अच्युत कांबळे (वय ३२), अक्षय बापू लावंड (वय २८), संतोष धावजी दाते (वय ३६, रा. राजगुरूनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभय अमाेल वाघमारे (वय १७), जक्रीया बिलाल शेख (वय २०, दोघे रा. वडगाव शेरी) अशी मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत. याबाबत पोलीस हवालदार पंकज मुसळे यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pune : लोणी काळभोरमधील ‘ऑइल माफिया’ प्रवीण मडीखांबेसह साथीदारांवर मोक्का कारवाई, पेट्रोल-डिझेल चोरीतून कोट्यवधींची संपत्ती

वडगाव शेरी परिसरात रविवारी पैगंबर जयंतीनिमित्त मिरवणूक आयोजित करण्यात आली होती. साडेदहाच्या सुमारास वडगाव शेरी भाजी मंडई परिसरात मिरवणूक आली. त्या वेळी अभय वाघमारे आणि काही तरुण झेंडा फडकावत होते. झेंडा लोखंडी गजाला लावण्यात आला होता. झेंडा फडकाविताना झेंड्याचा धक्का उच्च क्षमतेच्या वीज वाहिनीला लागला. झेंडा लोखंडी गजाला लावलेला असल्याने गजात विद्युतप्रवाह उतरला आणि विजेच्या धक्क्याने अभय खाली कोसळला. शेख यालाही विजेचा धक्का बसला. दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला.

सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली. चौकशीत मंडळाचे अध्यक्ष शेख यांनी पोलिसांनी दिलेल्या अटी आणि शर्तींचे पालन केले नसल्याचे निदर्शनास आले, तसेच कांबळे याने ट्रॅक्टरवर लाकडी फळी टाकून स्टेज बांधला. लावंड आणि दाते यांनी ध्वनीवर्धक आणि एलईडी स्क्रीन ट्रॅक्टरवर बसविली. त्यामुळे देखाव्याची उंची मर्यादेपेक्षा जास्त झाल्याने दुर्घटना घडली, असे पाेलीस हवालदार मुसळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply