
Pune : गुजरातवरील अत्यंत तीव्र कमी दाबाचे क्षेत्र (डीप डिप्रेशन) अरबी समुद्रावर येऊन शुक्रवारी (३० ऑगस्ट) त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवली आहे. ऑगस्टमध्ये चक्रीवादळ तयार होणे ही दुर्मीळ घटना असून, गेल्या १३२ वर्षांमध्ये या महिन्यात फक्त तीन चक्रीवादळे तयार झाली होती. आगामी चक्रीवादळाचे पाकिस्तानने केलेले नामकरण ‘असना’ असे आहे.
अतितीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे गेले काही दिवस गुजरातमध्ये अतिवृष्टी होऊन पूरस्थिती निर्माण झाली आहे. आता हे क्षेत्र नैऋत्येकडे सरकून अरबी समुद्रात प्रवेश करणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विभागाने जारी केलेल्या माहितीनुसार, उत्तर अरबी समुद्रावर शुक्रवारी चक्रीवादळाची निर्मिती होण्याची शक्यता असून, एक सप्टेंबरपर्यंत हे क्षेत्र पश्चिमेकडे सरकत राहील. ओमन किनाऱ्याजवळ पोचल्यावर त्याची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे.
|
|
जून ते सप्टेंबर या कालावधीत मान्सूनचा प्रवाह सक्रिय असल्याने समुद्राचे तापमान आणि वाऱ्यांची स्थिती चक्रीवादळांसाठी पोषक नसते. मात्र, अपवादात्मक स्थितीत ऑगस्ट महिन्यात या आधीही चक्रीवादळे तयार झाली आहेत. सन १८९१ ते २०२३ या १३२ वर्षांच्या कालावधीत ऑगस्ट महिन्यात बंगालच्या उपसागरावर २८ ; तर अरबी समुद्रात फक्त तीन (१९४४, १९६४, १९७६) चक्रीवादळे तयार झाली.
असना चक्रीवादळ पश्चिम किनारपट्टीपासून दूर जाणार असल्याने त्याचा महाराष्ट्रावर विशेष प्रभाव पडणार नाही असे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र, मध्य बंगालच्या उपसागरावर गुरुवारी तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे येत्या तीन सप्टेंबरपर्यंत राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील दोन दिवसांत बंगालच्या उपसागरतील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढून त्याचे डिप्रेशनमध्ये रूपांतर होईल. हे डिप्रेशन ओडिशा आणि आंध्र प्रदेशची किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता असून, त्याच्या प्रभावामुळे ३१ ऑगस्ट आणि एक सप्टेंबरला विदर्भासाठी; तर दोन तारखेला कोकण आणि मध्य महाराष्ट्रासाठी विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

