
Pune : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील आरोपी अगरवाल दाम्पत्य धनाढ्य आहे. त्यांना जामीन मंजूर केल्यास ते नीरव मोदी, विजय मल्ल्याप्रमाणे परदेशात पसार होतील. आरोपींचा जामीन अर्ज फेटाळण्या यावा, अशी विनंती तपास अधिकारी गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांनी सोमवारी न्यायालयात केली. कल्याणीनगर अपघात प्रकरणात सरकार पक्षाकडून विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी जामीन अर्जावरील यु्क्तिवाद पूर्ण केला. ॲड. हिरे यांनी आरोपींच्या जामीन अर्जास विरोध केला.
आरोपींनी केलेला गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे. कल्याणीनगर अपघात प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेला बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल, त्याची पत्नी शिवानी धनाढ्य आहेत.
अपघातानंतर मुलाच्या रक्तनमुन्या बदल करण्यासाठी त्यांनी ससूनमधील डाॅ. अजय तावरे, डाॅ. श्रीहरी हाळनोर यांना अश्फाक इनामदाकर, अमर गायकवाड यांच्यामार्फत पैसे दिले. डाॅ. तावरेला त्यांनी मोठी रक्कम देऊ केली होती. कल्याणीनगर अपघात प्रकरणात सहा साक्षीदार आहे. आरोपींना जामीन मंजूर झाल्यास ते साक्षीदारांना धमकावतील. अगरवाल दाम्पत्याला जामीन मंजूर केल्यास ते नीरव मोदी, विजय मल्ल्याप्रमाणे परदेशात पसार होण्याची शक्यता आहे, असे सहायक आयुक्त गणेश इंगळे यांनी न्यायालयात सांगितले.
|
Pune : जेजुरी गड तीर्थक्षेत्र विकास आराखडा : बायपासला परस्पर मान्यता ‘पीडब्ल्यूडी’चा प्रताप |
अल्पवयीन मुलगा, त्याचे वडील विशाल, आई शिवानी यांचे डीएनए चाचणी अहवाल न्यायालयासमोर सादर करण्यात आले आहेत. आरोपींनी पुरावा नष्ट करण्यासाठी प्रयत्न केल्याचे अहवालातून दिसून आले आहे, असे त्यांनी सांगितले. याप्रकरणाची पुढील सुनावणी बुधवारी (१४ ऑगस्ट) होणार आहे. बचाव पक्षाकडून ॲड. हर्षद निंबाळकर, ॲड. सुधीर शहा, ॲड. ऋषीकेश गानू, ॲड. प्रसाद कुलकर्णी, ॲड. सत्यम निंबाळकर काम पाहत आहेत.
अगरवालच्या मित्राने दिले पैसे
विशाल अगरवालचा बांधकाम व्यावसायीक मित्र आणि सार्वजनिक बांधकाम खात्यातील निवृत्त अधिकाऱ्याने डॉ. अजय तावरेशी ओळख काढली होती. त्यानंतर त्यांच्यात आर्थिक व्यवहार झाला. अगरवालच्या सांगण्यावरून त्याचा मित्र राजू याने चालकाकडे अमर गायकवाड आणि अश्फाक मकानदार यांना देण्यासाठी चार लाख रुपये दिले होते, अशी माहिती विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी न्यायालयात दिली. या गुन्ह्यात ससूनमधील एका अधिकाऱ्याने जबाब दिला. अपघाताचे वृत्त दूरचित्रवाहिनीवर पाहिल्यानंतर अधिकाऱ्याने मुलाच्या रक्त तपासणीचे अहवाल मागविले होते. अहवाल संशयास्पद वाटल्याने संबंधित अधिकाऱ्याने याबाबतची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली होती, असे हिरे यांनी युक्तिवादात नमूद केले.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

























Subscribe to my channel

