Pune : दुर्देवी! भीषण आगीत ऊसतोड कामगारांच्या तीन झोपड्या जळून खाक; लाखोंचे नुकसान

Ambegaon: पारगाव ता.आंबेगाव येथील चिकगाई मळा रस्त्यावर असलेल्या ऊसतोडी मजुरांच्या झोपड्यांना लागलेल्या आगीत तीन झोपड्या जळून खाक झाल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. या आगीत भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या ऊसतोड मजुरांच्या झोपड्या आणि संसारउपयोगी साहित्याची मोठी हानी झाली आहे..

पारगाव येथील भीमाशंकर साखर कारखाना लगत चिचगाईमळा रस्त्यावर आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ऊसाच्या पाचटापासून तयार केलेल्या झोपडयांना आग लागली. या सर्व झोपड्या आनशाबा खंडू चितळकर, अर्जुन नवनाथ क्षीरसागर तसेच किसन आनशाबा चितळकर (मूळ रा. पाथर्डी ) ऊसतोडणी मजुरांच्या होत्या. ज्यावेळी आग लागली तेव्हा ते सर्व तरुण सकाळी ऊसतोडणी मजूर ऊसतोडण्यासाठी शेतात गेले होते.

या आगीत आनशाबा चितळकर यांचे धान्य ,कपडे ,टिव्ही ,संसार उपयोगी वस्तू जनावरांचे खाद्य जळून खाक झाले. तसेच अर्जुन क्षीरसागर यांचे धान्य ,कपडे ,संसार उपयोगी वस्तू जळून जाऊन ३० हजार रुपययांचे नुकसान झाले.

दरम्यान, भीमाशंकर साखर कारखान्याने आग विझवण्यासाठी पाण्याचा टँकर पाठवल्याने आग नियंत्रणात आली त्यामुळे पुढील मोठी दुर्घटना टळली. या घटनेचा पंचनामा गावकामगार तलाठी विकास खोटे यांनी केला आहे. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply